32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
HomeमुंबईShiv Sena : गणेश विसर्जनात राडा करणाऱ्या 5 शिवसैनिकांचे मातोश्रीवर कौतुक

Shiv Sena : गणेश विसर्जनात राडा करणाऱ्या 5 शिवसैनिकांचे मातोश्रीवर कौतुक

गणेशोत्सवाच्या वेळी राडा करणाऱ्या 5 शिवसैन‍िकांचे मातोश्रीवर कौतुक करण्यात आले. यावेळी शिवसैन‍िकांना संयम बाळगण्याचे आव्हान केले आहे. दादारमध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना (Shiv Sena) गट यांच्यात शनिवारी रात्री राडा झाला होता

गणेशोत्सवाच्या वेळी राडा करणाऱ्या 5 शिवसैन‍िकांचे मातोश्रीवर कौतुक करण्यात आले. यावेळी शिवसैन‍िकांना संयम बाळगण्याचे आव्हान केले आहे. दादारमध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना (Shiv Sena) गट यांच्यात शनिवारी रात्री राडा झाला होता. यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली होती.‍ रविवारी सकळी शिवसेनेच्या नेत्यांनी दादर पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले होते. यामध्ये अन‍िल परब, अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर उपस्थित होते. त्यानंतर 5 शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली. दादरचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज जामीन मिळालेल्या 5 शिवसैनिकांना घेऊन विभाग प्रमुख महेश सावंत जामीन मिळालेल्यांना घेऊन मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी श‍िवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी या पाच जणांचे कौतुक केले.या भेटीनंतर विभाग प्रमख महेश सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयम बाळगण्याचे आव्हान केले असल्याचे शिवसैन‍िकांना सांगितले. आपल्याला श‍िवसेना पक्ष वाढवायचा आहे. मारामारी करायची नाही. उद्धव ठाकरे आमचे गुरु असल्याने आम्ही त्यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. असे महेश सावंत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला पैसे देऊ गर्दी जमवण्याचा सरकारचा प्रयत्न – अंबादास दानवे

Sharad Pawar : मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी – शरद पवार

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदेंचा सर्वोच्च न्यायालयात खटला, तरीही सरन्यायाधिशांसोबत बसतात हे चुकीचे’

एकनाथ‍ शिंदेंनी बंडखोरी केल्यामुळे शिवसैन‍िक आणि शिंदे गट आमने सामने ठाकले आहेत. गणेश विसर्जनाच्यावेळी संधी साधून त्यांनी दादरमध्ये राडा केला. या दोन्ही गटामध्ये धुसफुस सुरु आहे. संधी मिळेल तेथे हे दोन गट एकमेकांना भीडू शकतात. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी