26 C
Mumbai
Tuesday, September 24, 2024
Homeमहाराष्ट्रतुरुंगातील कैद्यांची होणार चंगळ?

तुरुंगातील कैद्यांची होणार चंगळ?

टीम लय भारी

मुंबई :- लोकसंख्या वाढीप्रमाणेच तुरुंगातील कैद्यांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणारे कैदी आणि तुलनेत अपुरे तुरुंग यामुळे नवीन 5 तुरुंग बांधण्याबाबत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे (A proposal to build the jail has been sent to the state government).

मुंबई, पुणे, हिंगोली, पालघर आणि गोंदिया या पाच शहरांमध्ये नवे कारावास उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यात मुंबईतील कारागृहाबद्दल सरकारने मान्यता दिली आहे. ही कारागृहे मियामी आणि शिकागो शहरातील कारागृहांवरून प्रेरणा घेऊन बांधण्यात येतील. ज्यात मोठ्या प्रमाणावर कैद्यांना ठेवता येऊ शकते.

दुसऱ्या राज्यातुन येणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्राची दारे उघडी; राजेश टोपे

मुंबई सायबर क्राईमच्या पोलिसांनी केली थोप टीव्ही ॲपच्या मालकाला अटक

कारागृहात नवीन सोयी काय उपलब्ध आहेत यावर प्रकाश टाकण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. राज्यात 45 ठिकाणी एकूण 60 कारागृहे आहेत. यातील कैद्यांची क्षमता 24 हजार इतकी असून त्यात एकूण 37 हजार कैदी ठेवण्यात आले आहेत. मुंबईतील कारागृहात क्षमतेपेक्षा दुपटीने जास्त कैदी आहेत त्यामुळे मुंबईतील कारागृहाचे काम लौकरात लौकर हाती घ्यावे लागेल (Work on the Mumbai jail will have to be taken up soon).

Jail has been sent to the state government
तुरुंग

एमपीएससी नियुक्तीसाठी झालेल्या बैठकीचा निर्णय जाहीर, 15500 पदांची होणार भरती

Uddhav Thackeray steering MVA ship amid challenges but must resist lure of non-BJP, non-Congress front

यापूर्वी कारागृहातील कँटीन मध्ये अंडी, दूध व बेकरी उत्पादने उपलब्ध होती. त्यात भर म्हणून आता चिकन, मासे, मिठाई आशा अनेक पदार्थांचा समावेश करून घेण्यात आलेला आहे. सोनपापडी, सुकामेवा, समोसा, कचोरी, पनीर, विविध प्रकारचे जूस, फळे शुद्ध तूप आदी पदार्थही मिळणार आहेत. कैद्यांना प्रोटीन आणि व्हिटॅमिन युक्त आहार मिळावा म्हणून हे राबवण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी