28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रदुसऱ्या राज्यातुन येणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्राची दारे उघडी; राजेश टोपे

दुसऱ्या राज्यातुन येणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्राची दारे उघडी; राजेश टोपे

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या राज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी नव्हती. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. मात्र, आता दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुसऱ्या राज्यातुन येणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्राची दारे उघडी केली आहेत (Rajesh Tope has opened the doors of Maharashtra for citizens coming from other states).

आज राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते म्हणाले, दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई सायबर क्राईमच्या पोलिसांनी केली थोप टीव्ही ॲपच्या मालकाला अटक

एमपीएससी नियुक्तीसाठी झालेल्या बैठकीचा निर्णय जाहीर, 15500 पदांची होणार भरती

महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून सर्वात आधी आरटीपीसीआर चाचणीचे सर्टिफिकेट घेतले जाते. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे (Only those who have a certificate will be given admission in Maharashtra, said Rajesh Tope).

सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची चर्चा

राज्यात बऱ्यापैकी लसीकरण झाले आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता दिली जाईल आणि लोकल ट्रेनही सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येतील अशी चर्चा होती. मात्र, कॅबिनेटने निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली नसल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यात दररोज 7 ते 9 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसल्याचे टोपेंनी सांगितले आहे.

धनंजय मुंडे नावाचा झंझावात…!

Schools can reopen only after colleges, says Maharashtra health minister Rajesh Tope

Rajesh Tope of Maharashtra citizens coming from other states
राजेश टोपे

या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण

तसेच राज्यातील एकूण 92 टक्के रुग्ण संख्या केवळ दहा जिल्ह्यात आहे. मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, असेही राजेश टोपेंनी सांगितले आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात लस देण्यात येणार

कोरोनावर मात करण्यासाठी देशात 42 कोटी लस येणार आहेत. ऑगस्टमध्ये महाराष्ट्राला चार सव्वाचार कोटी लस मिळायला हव्यात. लोकसंख्येच्या प्रमाणात लस देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला मोठ्या प्रमाणावर लस येतील, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

तिसऱ्या लाटेत डॉक्टरांची कमतरता भासणार नाही

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी अजून एक हजार डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. आठवडाभरात त्याची जाहिरात निघेल, असे सांगतानाच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीच्या वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत डॉक्टरांची कमतरता भासणार नाही, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी