28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमहाराष्ट्रनवनिर्वाचित राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ

नवनिर्वाचित राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ

टीम लय भारी

दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू आज (दि. 25 जुलै) राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा संसदभवन येथे पार पडणार असून आज सकाळी साडेदहा वाजता या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप नेत्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी गटातील नेते यशवंत सिन्हा यांना मागे टाकून दणदणीत विजय

मिळवला होता. आजच्या शपथविधीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले असून भारताचे सरन्यायाधीश रमण्णा हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ देणार आहेत.

द्रौपदी मुर्मू या देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपदी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर मुर्मू या राष्ट्रपतीपदासाठी पहिल्या महिला आदिवासी आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरणार आहेत. त्यांच्या या विजयानंतर अवघा देश आनंदोत्सव साजरा करीत आहे, शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीपती निवडणुकीच्या विजयानंतर भाजपच्या गोटात सुद्धा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा स्वतः मुर्मू यांच्या घरी जाऊन त्यांना अभिनंदन केले, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि इतरही महत्त्वाच्या नेत्यांनी द्रौपदी मुर्मू यांस शुभेच्छा दिल्या.

आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी मावळते राष्ट्रपती आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती दोघांची सुद्धा उपस्थिती असणार आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

संसदेतील शपथविधीचा कार्यकम संपल्यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील, जिथे त्यांना इंटर-सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर प्रदान केला जाणार आह, त्यावेळी मावळत्या राष्ट्रपतींचा शिष्टाचारानुसार सन्मान सुद्धा केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा…

‘तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही हे परत एकदा सिद्ध’, मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

शिवसेनेचे हकालपट्टी सत्र सुरूच, पक्षविरोधी कारवाई केल्याने आणखी सात जणांवर कारवाई

‘उलटी काळी बाहुली, टाचण्या टोचून कुंकूवाचा लिंबू’, विद्या चव्हाणांनी सुचवले शिंदेगटाला चिन्ह

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!