37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपोलीस आयुक्त संजय पांडेयांच्या पोलीस ठाण्यांना अनपेक्षित भेटी सुरू

पोलीस आयुक्त संजय पांडेयांच्या पोलीस ठाण्यांना अनपेक्षित भेटी सुरू

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर संजय पांडे यांनी शहरातील पोलीस ठाण्यांना अनपेक्षित भेटी देण्यास सुरुवात केली आहे.  त्यामुळे कामावर विनाकारण न येणाऱ्यांचे काही खरं नाही.तसेच विनाकारण इतर कर्मचाऱ्यांना सतावणाऱ्या पोलीस अधिकारी वर्ग जागृत झाला आहे. त्यांनी पोलिसांच्या दैनंदीन कामकाजाचा आढावा घेत काही सूचना केलेल्या आहेत.( Police Commissioner Sanjay Pandey’s unexpected visits to police stations begin)

वाकोला पोलीस ठाण्यात उपस्थित पोलीसअधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी पोलीस आयुक्तांनी संवाद साधूनत्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःचा मोबाईलक्रमांक देऊन काहीही तक्रार असल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा असेआवाहन केले.गृहमंत्रालयाने वरीष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडेयांची २८ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती केली आहे.त्यानंतर पांडे यांनी मुंबई पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडूनकामकाजासंबंधी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

 पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावतअसताना दक्ष राहावे. पोलीस ठाण्याचा परिसर, कार्यालय स्वच्छव मीटनेटके ठेवावे. चांगले वातावरण निर्माण होण्यासाठी पोलीसठाण्याची सजावट व रंगरंगोटी करावी. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीच्या स्वरूपानुसार निवारण करावे.रोज एकासामान्य नागरिकाला मदत करावी. तसेच कौटुबिक, सामाजीक प्रकरणे चुकीच्या पदावतीने हाताळायची नाहीत, अशा सूचना दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Parambir singh: परमबीर सिंहांसह सचिन वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

पवई पोलिस स्थानकाच्या सभागृहाची रोटरी क्लबने केली दुरुस्ती

Return of Sanjay Pandey, now as Mumbai top cop

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी