27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमोदींना तिहार जेल मध्ये कैद केल्याशिवाय राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा निर्धार

मोदींना तिहार जेल मध्ये कैद केल्याशिवाय राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा निर्धार

जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी बंगालच्या निवडणुकीत सांगितले होते की तुम्ही जर मोदींना निवडून दिल तर तुमचा व्यापार हा गुजरात्याला जाईल. हे लुटीच सरकार आहे. सगळ्यात मोठा चोर कोणी असेल तर इथला नरेंद्र मोदी आहे. अजून त्याच्या चोऱ्यांच्या कहाण्या आम्ही सांगितल्या नाहीत. ना खाऊंगा ना खाणे दुंगा अस म्हणणारा फक्त गुजरात्यांनाच खायला घालतो आणि दुसऱ्याच्या ताटातल काढतो. यांनी इतरांना तिहार जेल दाखवल आहे. आम्ही मोदींना तिहार जेल मध्ये कैद केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

वाढत्या जातीयता आणि धर्मांधतेतून सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राहुरी येथे बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगली घडविल्या जातील, समाजात फुट आणखी कशी वाढेल हे पहिल्या जाईल, त्यामुळे आताच निर्णय घ्या, आपलं मत आजच ठरवा आणि भाजप – आरएसएसची सत्ता उलथवून टाका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

हे सुद्धा वाचा 
एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

मोदी स्वतःच्या आईशी प्रामाणिक नाही, धर्मपत्नीला सांभाळत नाही तो तुमच्याशी काय प्रमाणिक राहील? भाजप आणि आरएसएसच गठबंधनला तुम्ही उलथून टाकू शकता. निवडणुकीत प्रचाराला वेळ मिळेल न मिळेन, पण माझं मत हे भाजपच्या विरोधात, हे पहिल्यांदा ठरवून घ्या. दुसरी कुठलीच चर्चा नाही, फक्त एकच चर्चा आणि ती म्हणजे भाजपला पुन्हा आम्ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये येऊ देणार नाही हे ठरवून टाका’, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मागील सरकार असताना दोन लाख कोटी खाल्ले असे मीडिया सांगत होता तर आता मोदींनी पंधरा हजार कोटी खाल्ले ते सुद्धा माध्यमांनी दाखवल पाहिजे. सगळे चॅनल हे मोदींनी अडानी आणि अंबानी यांना विकत घ्यायला लावले आहेत. त्यामुळे टिव्ही मध्ये मोदी विरोधात बातम्या येत नाही असा आरोपही त्यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी