38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंना केलं रुग्णालयात दाखल, 'या' स्नायूची होणार शस्त्रक्रिया

राज ठाकरेंना केलं रुग्णालयात दाखल, ‘या’ स्नायूची होणार शस्त्रक्रिया

टीम लय भारी

मुंबई :-  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यावर कमरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया होत आहे, त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही या बैठकीला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती, परंतु त्यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावतीत दाखल करण्यात आल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाहीत.

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी ३ दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात एमआरआय (MRI) चाचणी केली होती. आज त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. फार गंभीर बाब नाही. शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाईल. परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या दुखण्याच्या त्रासाची माहिती जाणून घेत विचारपूस केली होती. तसेच लीलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचे ही सुचवले होते.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा ही देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबत सुरू असलेल्या बैठकीत दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी