38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रबायकांच्या आडून करण्यात येणारे शिखंडीचे उद्योग भाजपने बंद करावे : संजय राऊतांचा...

बायकांच्या आडून करण्यात येणारे शिखंडीचे उद्योग भाजपने बंद करावे : संजय राऊतांचा घणाघात

टीम लय भारी

मुंबई : सध्या महाराष्ट्रात राणा विरुद्ध सेना हा ड्रामा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा ईशारा दिला. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्व प्रकारावर बायकांच्या आडून करण्यात येणारे शिखंडीचे उद्योग भाजपने बंद करावे, असा घणाघात शिवसेना खासदार  संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ( Sanjay Raut’s Criticism of BJP from recitation of Hanuman Chalisa by Rana couple)

कोणाच्यातरी पाठबळाने तुम्ही आमच्या मातोश्रीत प्रवेश करत असाल.तर शिवसैनिक गप्प बसेल का? कायदा आणि सुव्यवस्था काय आहे हे आम्हाला सांगू नका. सरकारने काय केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे याचे सल्ले तुमच्याकडून ऐकून त्यासंदर्भत अंमलबजावणी करण्या इतपत महाराष्ट्राला भिकारीपण आलेले नाही. आमच्या मातोश्रीला बदनाम करणारे कोण तुम्ही आहात . त्यामुळे तुम्ही लायकीप्रमाणे रहा. मग शिवसैनिकालाही चिडून तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपती राजवट लागेल या धमक्या आम्हाला देऊ नका. सीबीआय, ईडी लावा आम्हाला त्याचा काही त्रास नाही, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

केंद्रीय पोलीस बलाचा वापर करुन आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही . शिवसैनिक हा सदैव मरायला आणि मारायलाही तयार असतो. भाजप पक्षा केंद्रीय यंत्रणांच्या पाठबळावर तुमची झुंडशाही आहे.त्यातुम्ही जर आमच्यावरती हात उगारण्याचा प्रयत्न कराल तर तो शिवसैनिक आहे .सत्तेची पर्वा आम्हाला नाही. शिवसेना ही एक पावर आहे.त्याचा चटका घ्यायचा आहे त्यांनी खुशाल करा, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

बायकांच्या आडून भाजप पक्ष जे शिखंडीचे उद्योग करत आहे ते बंद करा.कालपर्यंत हिंदूत्वावरती हल्ले करणारे बंटी आणि बबली आणि नवहिंदूत्ववादी ओवेसी आहेत त्यांना मोठं करण्याचं काम भाजप पक्ष करत आहे. त्यामध्ये भाजपचेच हात जळणार आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.


हे सुद्धा वाचा :

संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून आपल्या यशाचे गमक सांगितल्यास, अन्य पत्रकारही आपली प्रगती करु शकतात

लफंगेगिरीला हिंदूत्त्ववादामध्ये स्थान नाही, संजय राऊत यांचा भाजपला टोला

‘BJP will pay for this’: Sanjay Raut after ED raids firm owned by brother-in-law of Maha CM

खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप प्रत्यारोप थांबवावे -हेमंत पाटील      

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी