35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रइमरान प्रतापगडी यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी

इमरान प्रतापगडी यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी

 टीम लय भारी

मुंबई: राज्यातील राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra congress) नेत्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आशिष देशमुख यांना राज्यसभेचं आश्वासन देण्यात आलं होतं. खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु ते पाळलं गेलं नाही, असा दावा आशिष देशमुख यांनी केला.

काँग्रेस नेत्या नगमा यांनी आपल्याला ही उमेदवारी मिळायला हवी होती अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करुन असं म्हटलं की, इम्रान प्रतापगढी यांच्यासमोर आमची 18 वर्षांची तपस्या फिकी पडली असं म्हणत नगमा यांनी आपली नाराजी व्यक्त केली. शायर इम्रान प्रतापगडी हे उत्तरप्रदेशातील काँग्रेस नेते आहेत. एका बाहेरच्या नेत्याला राज्यसभेवर पाठवले जात आहे यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra congress) नेत्यांवर अन्याय होतो असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील ६ जागांवरील राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या ६ जागांसाठी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे.

इमरान प्रतापगडी यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी

हे सुद्धा वाचा: 

हा धनगर तुमच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही :  आमदार गोपीचंद पडळकर

Chinese Firms in India Under Scanner; ZTE and Vivo Being Investigated for Financial Irregularities

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी