33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रOfficer : प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे खूप मोठी ताकद असते - डॉ. सचिन मोटे

Officer : प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे खूप मोठी ताकद असते – डॉ. सचिन मोटे

प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे (Officer) खूप मोठी ताकद असते असे प्रतिपाद डॉ. सचिन मोटे यांनी केले. विटयामध्ये साध्य फाऊंडेशनच्या परीक्षा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे (Officer) खूप मोठी ताकद असते असे प्रतिपाद डॉ. सचिन मोटे यांनी केले. विटयामध्ये साध्य फाऊंडेशनच्या परीक्षा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. देश चालविण्याचे काम प्रशासनातील अधिकारी करत असतात. त्यामुळे युवकांनी मोठया प्रमाणात प्रशसानात आले पाहिजे. ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवेत जाण्याची क्षमता असते असे आयकर विभागाचे उपसंचालक डॉ. सचिन मोटे यांनी सांगितले. या वेळी त्यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. सांगली जिल्ह्यातील विटा येथे साध्य फाऊंडेशनच्या वतीने मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्धटन करण्यात आले.

या वेळी डॉ. साचिन मोटे म्हणाले की, जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. अधिकारी बनले पाहिजेत. कॉलेजमधील जिवन हे करिअर घडविण्यासाठी असते. आतापासून अभ्यासाला सुरूवात करा. युपीएससी, एमपीएसी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी तरुणांना दिल्ली, पुणे, मुंबई शहरात जावे लागते. ज्यांची परिस्थ‍िती हालाखीची आहे असे विद्यार्थी आता गावात राहून परीक्षा देऊ शकतात. साध्य फाऊंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्याने मार्ग सुकर होईल.

तरुणांना लोकसेवा व सरळसेवा तसेच इतर अनेक प्रकारच्या परीक्षांचा अभ्यास या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी दर महिन्याला क्लासवन अधिकारी येऊन मार्गदर्शन करतील. कॉलेजमध्ये शिकत असतांनाच आपल्या उज्जवल भविष्याचा व‍िचार करा. हार मानू नका. आई वडीलांचे स्वप्न साकार करा. स्पर्धेच्या युगात स्वत:ला सामर्थ्यवान बनवा. यावेळी अनेक राजकीय नेते, नगरसेवक, नगराध्यक्ष तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

Queen Elizabeth : राजवाडयात जन्म घेऊनही राणी एलिझाबेथच्या पतवंडाना राजकीय वारसा मिळालेला नाही

Shiv Sena : गणेश विसर्जनात राडा करणाऱ्या 5 शिवसैनिकांचे मातोश्रीवर कौतुक

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला पैसे देऊ गर्दी जमवण्याचा सरकारचा प्रयत्न – अंबादास दानवे

यावेळी माजी नगराध्यक्ष अँड. वैभव पाटील, माजी नगरसेवक अन‍िल बाबर, कृष्णात गायकवाड, पांडुरंग मुळीक, रमेश शितोळे, श‍िवाजी हारुगडे, पुरवठा अधिकारी दादासो, पुकळे, बाळासाहेब मेटकरी, तेजस, लेंगरे, भालचंद्र कांबळे, प्रशांत कांबळे, रोहित पाटील, वसीम मुल्ला, सुजित जानकर, महेश कदम, शंकर मोहित, सुशांत देवकर, विकास फासे, संजय जाधव,

सुनील गायकवाड, मंगेश हजारे, अविनाश चोथे, मासाळ, बंडूशेठ कातुरे, दादाशेठ कचरे, राहूल शितोळे, गजानन सुतार, हेमंत रोडे, विकास जाधव, माधव रोकडे, विनोद पाटील, दिलीप कचरे, शैलेश सहानी, ग्रामसेवक सचिन सरक, हणमंत मोटे, सागर पाटील, यांच्यासह स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी पालक व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक रोहित पाटील यांनी केले. सूत्रसंचलन लखनराज खांडेकर यांनी केले. आभार सुजित जानक यांनी मानले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी