37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeसंपादकीयQueen Elizabeth : राजवाडयात जन्म घेऊनही राणी एलिझाबेथच्या पतवंडाना राजकीय वारसा मिळालेला...

Queen Elizabeth : राजवाडयात जन्म घेऊनही राणी एलिझाबेथच्या पतवंडाना राजकीय वारसा मिळालेला नाही

महाराणी एलिझाबेथ यांचा नातू प्रिंस हॅरी यांच्या मुलांना राजकुमार आणि राजकुमारी ही पदवी अजून मिळालेली नाही. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले आहे. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महाराणी एलिझाबेथ यांचा नातू प्रिंस हॅरी यांच्या मुलांना राजकुमार आणि राजकुमारी ही पदवी अजून मिळालेली नाही. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले आहे. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्र‍िंस हॅरी आणि मेगन मार्कल यांची मुले आर्ची आणि लिलिबेट यांना अजून राजघराण्याचे अधिकार मिळाले नाहीत. मेगनला वाटले होते. की आपल्या मुलांना राजघराण्याचा किताब मिळेल. परंतु अजून मिळालेला नाही. मेगनने यापूर्वी आपल्या मुलांना पोलीस सुरक्षा मिळालेली नसल्याचे म्हटले होते. प्रिंस चार्ल्स यांनी सिंहासन ग्रहण केल्यानंतर तरी पदवी मिळेल असे वाटले होते.

किंग जॉर्ज पंचम यांनी 1917 मध्ये एक नियम काढला होता. त्यानुसार एका राजाच्या मुलांना त्यानंतर त्यांच्या नात-नातू यांना राजकुमार आणि राजकुमारीची पदवी आपोआप मिळेल. मात्र ते महाराणीची पतवंड आहेत. त्यामुळे त्यांना राजकुमार आणि राजकुमारी घोष‍ीत करण्यासाठी काही पत्रव्यवहार करावा लागण्याची शक्यता आहे. यामध्ये शाही राजांची संख्या मर्यादीत करण्यासाठी 2021 मध्ये काही निर्णय घेण्यात आले होते. 2020 मध्ये हॅरी हे कुटुंबापासून वेगळे झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

Shiv Sena : गणेश विसर्जनात राडा करणाऱ्या 5 शिवसैनिकांचे मातोश्रीवर कौतुक

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला पैसे देऊ गर्दी जमवण्याचा सरकारचा प्रयत्न – अंबादास दानवे

Sharad Pawar : मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी – शरद पवार

प्रिंस हॅरी त्याची पत्नी मेगन सोबत 9 जानेवारी 2020 मध्ये शाही‍परिवारापासून वेगळे झाले. तो अनुभव खूपच कठिण‍ होता असे हॅरीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. तो अनुभव त्याची आई डायनासाठी देखील कठ‍िण होता. हॅरीची पत्नी मेगन ही एक अभ‍िनेत्री होती. ती ब्रिटीश नाही. ती शाही पर‍िवारापेक्षा वेगळया पद्धतीने राहत होती. त्यामुळे शाही पर‍िवार तिच्यावर नाराज होता. त्यामुळेच तिला राजवाडयातून बाहेर पडावे लागले.

तिला अप्रत्यक्षरित्या वर्णभेदाचा सामना करावा लागला. आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता त्यांना सुरुवातीपासूनच सतावत होती. रंगभेदामुळे मेगन वैफल्यग्रस्त झाली होती असेही सांगितले जाते. यासंदर्भात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. राणी एलिझाबेथ यांनी संपूर्ण परिवाराला विचारमंथन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी