30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य सरकार मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी देणार : राजेश टोपे

राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी देणार : राजेश टोपे

टीम लय भारी     

मुंबई : मराठा आरक्षणाचा लढा काही वर्षापूर्वी आक्रमकतेने सुरु होता. मराठा आरक्षणाचा लढा देत असताना अनेकांनी बलिदान दिले. या आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी याचीही मागणी वारंवार केली गेली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे(State government Jobs will be given to the heirs).

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिले होते. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणे गरजेचे आहे. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात येणार असल्याचे, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत (CM चर्चा केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत केली होती. आता मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरी मिळणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’

वाढदिवसानिमित्त ऑनलाईन शुभेच्छा द्या : जयंत पाटील

शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले होते.

धनंजय मुंडे यांची शरद पवारांच्या नावाने मोठी योजना, ‘या’ दुर्लक्षित घटकांची जबाबदारी घेणार सरकार

Regulate Rapid RT-PCR test rates at Mumbai airport: Rajesh Tope to IRS officer

महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. राजेश टोपे यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरुन शेअर केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी