33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयमंत्री वर्षा गायकवाडांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी, आत्महत्या करायला निघालेले महिलेचे प्राण...

मंत्री वर्षा गायकवाडांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी, आत्महत्या करायला निघालेले महिलेचे प्राण वाचविले

टीम लय भारी

मुंबई: मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेला शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी बघताक्षणी वाचवले. दोघांच्या धाडसी कृत्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले त्याचा सर्व कर्मचारी वर्गाला अभिमान आहे असे सांगून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड  त्यांनी दोघांचे अभिनंदन केले.(Minister Varsha Gaikwad office staff performance Commendable)

नेमका प्रसंग काय घडला?

काल दुपारच्या सुमारास मंत्रालयात रुपा मोरे या महिलेने मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. शिव अर्थात सायन येथील त्यांच्या झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीतील घराचा ताबा मिळत नसल्याने त्यांनी ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे समोर आले आहे. आणि नेमके याच मजल्यावर शालेय शिक्षण मंत्र्यांचे कार्यालय आहे. शिक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांना ही घडणारी बाब लक्षात येताच दोघांनी घटनास्थळी धाव घेतली, सदर आत्महत्या करणाऱ्या महिलेला रोखले, व सुदैवाने हा अनर्थ टाळला.

शिक्षण मंत्री कार्यालयातील विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी वेळीच महिलेला रोखल्या नंतर पोलिसांनी मोरे यांना तात्काळ ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले.

हे सुद्धा वाचा

शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणू नका,वर्षा गायकवाड यांचं आवाहन

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवणार : वर्षा गायकवाड

शिक्षण मंडळाचा निर्णय, 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार

Maharashtra Class X-XII offline exams: Students protest near state Minister Varsha Gaikwad’s residence

या अगोदर धुळ्याच्या धर्मा पाटील या 84 वर्षे शेतकऱ्यांनी 2018 मध्ये मंत्रालयात विषप्राशन केले होते त्यांचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच वर्षी हर्षल रावते 45 वर्षीय व्यक्तीने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर उडी मारुन आपले जीवन संपवले या घटनेनंतर मात्र मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी