35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमंत्रालयसुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हेंच्या पत्राला अनिल देशमुखांनी दाखविली केराची टोपली

सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हेंच्या पत्राला अनिल देशमुखांनी दाखविली केराची टोपली

टीम लय भारी

मुंबई : बदल्या व नेमणुका म्हणजे मलिदा हडपण्याचा उत्तम मार्ग. पण त्यासाठी मंत्री बुद्धी गहाण टाकूनच निर्णय घेतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या एका नियुक्तीमधूनच हा गंभीर प्रकार समोर आला आहे ( Anil Deshmukh appointed a controversial person).

मंत्रालयात सध्या बदल्यांचा बाजार तेजीत आहे ( Corruption in officers transfers ). गृह विभाग या बाजारात अधिक आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे. पण या बदल्या करताना गृह मंत्री अनिल देशमुख इतकी पातळी सोडतील याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वास्तविक, गेली कित्येक वर्षे राजकीयदृष्ट्या कोमात असलेल्या अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाची लॉटरी लागली अन् ते अचानक जोमात आले. पण या पदाची नशा आता त्यांच्या डोक्यात गेल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रालयात भरलाय बदल्यांचा बाजार

Breaking : तहसिलदारांच्या बदल्यांचा आदेश जारी; वाचा तुमच्या तालुक्यात कोण आले, कोण गेले

Breaking : उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; वाचा तुमच्या जिल्ह्यात कोण आले, कोण गेले

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

देशमुख यांनी चक्क खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार व आमदार विद्या चव्हाण यांच्या पत्रालाच केराची टोपली दाखविली आहे ( Anil Deshmukh ignored to Supriya Sule’s letter ).

lay bhari

आपल्याच पक्षाच्या दोन खासदार, अन् दोन आमदारांनी पाठविलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविण्याची हिमंत अनिल देशमुखांकडे आली कुठून अशी चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

‘राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणा’च्या सदस्यपदी अनिल देशमुख यांनी राजकुमार ढाकणे या व्यक्तीची नियुक्ती केली आहे. वास्तविक या पदावर अन्य एका व्यक्तीची नियुक्ती व्हावी यासाठी सुप्रियाताई व डॉ. कोल्हे यांनी पत्रे दिली होती. सामाजिक कार्यात सक्रीय असणारी, कोणताही गुन्हा दाखल नसलेल्या या व्यक्तीची सदस्यपदी नियुक्ती करावी असे सुळे व कोल्हे यांच्या पत्रात म्हटले आहे.

Mahavikas Aghadi

सहा महिन्यांपूर्वीच ही पत्रे देण्यात आली होती. पण अनिल देशमुख यांनी या पत्रांची दखलच घेतली नसल्याचे दिसत आहे. सुप्रियाताई व कोल्हे यांच्या पत्रांना भाव न देता देशमुख यांनी राजकुमार ढाकणे या वादग्रस्त व्यक्तीची नियुक्ती केली आहे.

ढाकणे यांच्यावर गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. त्यामुळे गुन्हेगारट पोलिसांना न्याय देण्याचे काम कसे करू शकतील असा सवाल उपस्थित झाला आहे.

Anil Deshmukh did wrong appointment
देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना पत्र लिहिले आहे

राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ( Devendra Fadnavis’ letter to Anil Deshmukh ) अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात फडणवीस यांनी देशमुखांवर संताप व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी