29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रअहिल्यादेवींच्या नावाने साकारताहेत 65 देखण्या वास्तू

अहिल्यादेवींच्या नावाने साकारताहेत 65 देखण्या वास्तू

टीम लय भारी

मुंबई : धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने राज्यभरात तब्बल ६५ देखण्या वास्तू साकारल्या जात आहेत. यापैकी पहिल्या वास्तूचे उद्घाटन येत्या १३ ऑगस्ट रोजी होणार आहे ( Ahilyadevi Holkar auditoriums constructed in Maharashtra ).

lay bhari

अहिल्यादेवी होळकर यांची १३ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे ( Ahilyadevi death anniversary ). त्याचे औचित्य साधून अकोला येथे निर्माण केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहा’चे उद्घाटन करण्यात येणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन होईल, अशी माहिती खासदार डॉ. विकास महात्मे यांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली ( Sudhir Mungantiwar will inaugurate Ahilyadevi auditorium ) .

हे सुद्धा वाचा

VidhanParishad 12 seats appointment : धनगरांना भाजपचा आसरा, महाविकास आघाडीकडून मात्र काणाडोळा

Rural Maharashtra : धनगर समाजाच्या देवीची यात्रा शेकडो वर्षानंतर रद्द !

माजी मंत्री महादेव जानकर शेतात तण काढताहेत, औत चालवताहेत, अन् रोपेही लावताहेत

अमृता फडणवीसांना संतप्त पोलीस अधिकाऱ्याचे पत्र

Ahilyadevi Holkar auditorium
अहिल्यादेवींच्या नावाने अशा ६५ वास्तू महाराष्ट्रात उभ्या राहणार आहेत

भाजपच्या सरकारच्या कार्यकाळात राज्यभरात अशी सभागृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी डॉ. महात्मे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता ( Dr. Vikas Mahatme was taken efforts for Ahilyadevi auditoriums ) .

Mahavikas Aghadi

त्यानुसार राज्यभरात सभागृहांची कामे सुरू आहेत. अकोला येथील पहिल्या सभागृहाचे काम पुर्णत्वास गेले आहे. १० हजार प्रती चौरस फूट आकाराचे हे सभागृह आहे.

व्याख्याने, जनजागृती सोहळे, जाहीर कार्यक्रम, विवाहे सोहळे अशा अनेकविध कार्यांसाठी या सभागृहाचा वापर करता येईल. समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी या सभागृहाचा वापर होईल, असे डॉ. महात्मे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी