33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमंत्रालय‘सातारा हॉस्पीटल’वर मंत्रालयातून कारवाईचे आदेश

‘सातारा हॉस्पीटल’वर मंत्रालयातून कारवाईचे आदेश

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ची लागण झालेला मृतदेह नातलगांकडे दिल्यामुळे एकाच गावातील ९ जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. या प्रकरणी बेजाबदारपणा दाखविणाऱ्या ‘सातारा रूग्णालया’वर कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे ( Rajesh Tope has taken stringent action against Satara Hospital )

lay bhari

आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्यामार्फत ‘सातारा रूग्णालयावर’ कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. गेल्या आठवड्यात राजेश टोपे सातारा दौऱ्यावर होते. त्याच दिवशी हा प्रकार चव्हाट्यावर आला.

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ‘मिशन मोडवर’ काम करण्याची गरज आहे. मात्र साताऱ्यातील यंत्रणा निष्काळजी वागत असल्याचे टोपे यांचे म्हणणे आहे. अशातच ‘सातारा रूग्णालयाने’ बेफिकीरपणा दाखविला.

हे सुद्धा वाचा

खळबळजनक : शरद पवार, राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच सातारा प्रशासनाकडून भयानक घोडचूक

Breaking : राजेश टोपे आक्रमक, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे 9 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याप्रकरणी मागविला अहवाल

माणच्या निष्काळजी प्रांताधिकारी, तहसिलदारांची उचलबांगडी होणार

राजेश टोपेंचे रात्रभर झाले जागरण, साताऱ्यातील दोन गंभीर घटना निस्तारण्यात गेला वेळ

‘सातारा रूग्णालया’च्या बेजबाबदारपणामुळे सरकारची संपूर्ण महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. शिवाय पांढरवाडी ( ता. माण ) या गावात नऊजणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. ‘सातारा रूग्णालया’ने मृतदेह नातलगांना दिला नसता तर हा प्रकार घडलाच नसता असे टोपे यांची भावना आहे.

‘सातारा रूग्णालयाला’ नोटीस पाठवा, आणि पुढील कार्यवाही करा असे आदेश टोपे यांनी आरोग्य संचालक अर्चना पाटील यांना दिले आहेत. टोपे यांच्या कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

बाळासाहेब थोरात यांच्याकडूनही दखल

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही रूग्णालयाच्या हलगर्जीपणाबाबतची माहिती घेतली आहे. या प्रकरणात आरोग्य व महसूल विभागानेही हलगर्जीपणा दाखविल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. त्यामुळे थोरात यांनी लक्ष घातले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी