29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमंत्रालयआमदार रोहित पवारांचा कमालीचा विनम्रपणा, मंत्रालयात चक्क व्हरांड्यात बसले

आमदार रोहित पवारांचा कमालीचा विनम्रपणा, मंत्रालयात चक्क व्हरांड्यात बसले

टीम लय भारी

मुंबई :  आमदार रोहित पवार हे कमालीचे विनम्र आहेत. त्यांचे पाय जमिनीवर आहेत, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय आज मंत्रालयात आला ( MLA Rohit Pawar is a down to earth leader ).

एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे आमदार रोहित पवार व्हरांड्यातील कट्ट्यावर बसले होते. आपण आमदार आहोत, पवार कुटुंबातील आहोत, अशी कोणतीही मिजास न मिरवता ते शांतपणे कट्ट्यावर बसले होते. त्यांना कट्ट्यावर बसल्याचे पाहातच काहीजण त्यांच्या जवळ गेले, व बातचीत सुद्धा केली.

MLA Rohit Pawar visits in Mantralaya
आमदार रोहित पवार मंत्रालयातील व्हरांड्यात चक्क कट्ट्यावर बसले

मंत्रालयात कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सामान्य लोक येत असतात. विविध कार्यालयातून खेटे मारल्यामुळे सामान्य लोक थकून जातात, अन् नंतर व्हरांड्यातील या कट्ट्यावर काहीसा विसावा घेतात. पण आज (मंगळवारी) चक्क आमदार रोहित पवार यांनाच कट्ट्यावर विसावा घेताना बघून उपस्थितांना आश्चर्य वाटले ( MLA Rohit Pawar visits in Mantralaya ).

हे सुद्धा वाचा

Rohit Pawar : रोहित पवारांची मतदारसंघासाठी ‘स्मार्ट’ योजना

MLA Rohit Pawar : डोळ्यात पाणीच येणार, चिमुकलीने आमदार रोहित पवारांशी साधलेला संवाद नक्की ऐका

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांनी त्रस्त जनतेला दिला दिलासा, मतदारसंघात घेतला मोठा निर्णय

Coronavirus : आमदार रोहित पवारांकडून अहमदनगर व राज्यासाठी 20 हजार लिटर सॅनिटायझरचा पुरवठा

VIDEO : रोहित पवारांचे विधानसभेत पहिलेच भाषण, भाजपवर केला हल्लाबोल

राष्ट्रवादीचे जामखेडमधील कार्यकर्ते म्हणतात, रोहित पवारांना ग्रामविकासमंत्री करा 

एरवी सामान्य राजकीय कार्यकर्ता सुद्धा इतका विनम्र दिसत नाही. आमदार रोहित पवार यांना मंत्रालयात सगळेच ओळखतात. त्यामुळे एखाद्या मंत्र्यांच्या कार्यालयात ते गेले असते तर शिपाई किंवा अन्य कर्मचाऱ्यांनी त्याना बसायला लगेचच खूर्ची दिली असती.

Mahavikas Aghadi

रोहित पवार यांनी असा कोणताही बडेजाव न मिरवता व्हरांड्यातील कट्ट्यावर बसणे पसंत केले. मंगळवारी ते मंत्रालयात आले होते. मतदारसंघातील, जनहिताच्या कामांसंदर्भात त्यांनी काही मंत्री व अधिकाऱ्यांकडे आज पाठपुरावा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी