30 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरसिनेमाVIDEO :ड्रीम गर्ल-2 चा टीझर रिलीझ; आयुष्यमान खुराना पूजाच्या भूमिकेत!

VIDEO :ड्रीम गर्ल-2 चा टीझर रिलीझ; आयुष्यमान खुराना पूजाच्या भूमिकेत!

व्हेलेंटाईन्स डेच्या निमित्ताने बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याच्या ड्रीम गर्ल -2 चा टीझर रिलीझ झाला आहे. चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून या टीझरला 1.8 मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांवर आपल्या आवाजाची जादू करणारी पूजा आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी येत आहे. एक मिनीट 3 सेकंदाचा हा टीझर आहे. हा चित्रपट 7 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Dream Girl-2 Teaser Release; Ayushmann Khurrana as Pooja!)

ड्रीम गर्ल -2 च्या टीझरमध्ये चित्रपटातील पात्र पूजा पठाणसोबत फोनवर बोलताना दिसत आहे. ती म्हणते की, हॅलो मी पूजा बोलतेय… तुम्ही कोण? त्यावर समोरुन शाहरुख खानचा आवाज येतो आणि मी पठाण बोलत असल्याचे सांगतो. त्यानंतर ती पठाणला व्हेलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा देते. या चित्रपटामध्ये आयुष्यमान एक स्त्री पात्र साकारणार आहे. आयुष्यमान खुरानाची ही भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतुर झाले आहेत.

अभिनेता आयुष्यमान खुराना याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचा टीझर पोस्ट केला असून ”ब्रेकिंग न्यूज ड्रीम गर्ल परत येत आली आहे, 7 जणांना सोबत पाहणार” असे कॅप्शन देखील दिले आहे. ड्रीम गर्ल ही आयुष्यमान खुरानाच्या फिल्मी करिअर मधली सर्वात हिट फिल्म मानली जाते. 2019 मध्ये ड्रीम गर्ल फिल्म रिलीझ झाली होती. या चित्रपटाने 142.26 कोटी रुपयांचा गल्ला कमविला होता. राज शांडिल्य यांनी हि फिल्म दिग्दर्शित केली होती. ड्रीम गर्लचा पुढचा पार्ट ड्रीम गर्ल -2 आता जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)


ड्रीम गर्ल- 2 मध्ये मोठी स्टार कास्ट आहे. या चित्रपटामध्ये आय़ुष्यमान खुरानासोबत अभिनेत्री अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, अन्नू कपूर, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बॅनर्जी, मनज्योत सिंह देखील असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले असून चित्रपटाची निर्माता बालाजी टेलिफिल्मची एकता कपूर आहे.

हे सुद्धा वाचा

राणादा आणि पाठकबाईंचं लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेंटाईन डे; खास क्षण सोशल मिडियावर व्हायरल

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

स्टीवन स्पीलबर्ग एस.एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’ चित्रपटावर फिदा!

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी