35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईसुवर्णसंधी: अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने झाले स्वस्त; जाणून घ्या नवे दर

सुवर्णसंधी: अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने झाले स्वस्त; जाणून घ्या नवे दर

अक्षय्यतृतीयेनिमित्त सोने चांदी खरेदी करण्याची योजना असेल तर आज चांगली संधी आहे. कारण आज दोन्ही मौल्यवान वस्तूंच्या किंमतीत अंदाजे २०० रुपयांची घसरण झाली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्हीपण अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. कारण आज दोन्ही मौल्यवान वस्तूंच्या किंमतीत अंदाजे 200 रुपयांची घसरण झाली आहे.

आयबीजेएच्या संकेतस्थळानुसार, आज 24 कॅरेटसाठीचे दर अंदाजे 61,080 रुपये प्रती तोळाच्या घरात आहेत. काल हा दर 61,310 रुपये रुपये होता. कालच्या तुलनेत किंमतीत आज केवळ 230 रुपयांची घसरण झालेली पहायला मिळत आहे. आज 22 कॅरेटसाठी तोळा सोन्याची किंमत 56,000 रुपये आहे. काल हे दर 56,200 रुपये होते. कालच्या तुलनेत त्यात 200 रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, चांदीचे दागिने अथवा आगामी लग्नसराईच्या निमित्ताने चांदीच्या वस्तू खरेदी करण्याचा प्लान असेल तर आज दरात 200 रुपयांची घट झाली आहे. चांदीचे आजचे दर हे अंदाजे 77,400 रुपये प्रति किलोंच्या घरात आहेत. काल हे दर अंदाजे 77,600 रुपये प्रति किलों रुपये होते. आज त्यात अंदाजे 200 रुपयांची घट झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी