29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईकूपरेज बँडस्टँड येथे एनसीपीए ऍट दी पार्क संगीत व कला महोत्सवास प्रारंभ

कूपरेज बँडस्टँड येथे एनसीपीए ऍट दी पार्क संगीत व कला महोत्सवास प्रारंभ

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्राचा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दक्षिण मुंबईत स्थित कूपरेज बँडस्टँड उद्यान येथे राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्) यांच्यावतीने ‘एनसीपीए ऍट दी पार्क’ हा संगीत व कला महोत्सव सुरू झाला आहे.(Cooper’s Bandstand Commencement of NCPA at the Park Music Arts Festival)

याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी येथे भेट दिली.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात आज ‘सिंफनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया’चे कलाकारांनी वॉल्झ, मार्चेस, पोल्फा यासारख्या संगीत प्रकारांचे सादरीकरण केले. आज शनिवारी , दिनांक ५ मार्च  २०२२ रोजी सायंकाळी ‘अनइरेझ पोएट्री’ हा भारतातील सर्वात मोठा बोलभाषा गट अनोख्या काव्यात्मक छंदांत गुंफून गद्य कथा सादर करणार आहेत.

Cooper's Bandstand Commencement of NCPA at the Park Music Arts Festival

दिनांक ११ मार्च २०२२ रोजी वसंत उत्सवात लावणी, टागोर नृत्य आणि कथ्थक अशा भारतातल्या विभिन्न नृत्यप्रकारांनी वसंत ऋतूचं आगमन साजरं केलं जाईल. तर दिनांक १२ मार्च २०२२ रोजी कोमल कुवाडेकर आणि जॅझ बँड यांच्यावतीने जॅझ, सोल, फंक व आर ऍण्ड बी सारख्या भावपूर्ण संगीत प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास  प्रथम येणा-यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश दिला जातो आहे. कोविड प्रतिबंधक सर्व निर्देशांचे पालन करुन हा उपक्रम राबविला जात आहे.

हे सुद्धा वाचा

बिग बींना तूर्तास दिलासा! BMC ची कारवाई अद्याप करू नये, उच्च न्यायालयाचा आदेश

BMC चा प्रभागरचना आराखडा सादर, 236 जागांसाठी प्रभाग सीमा केल्या निश्चित

बीएमसीची निवडणूक शिवसेना ,भाजपसाठी ‘वादळी’ ठरणार

Move to identify sensitive booths for BMC polls

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी