35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयनारायण राणे, नितेश राणे पोलीस चौकशीसाठी राहणार हजर

नारायण राणे, नितेश राणे पोलीस चौकशीसाठी राहणार हजर

टीम लय भारी

मुंबई : दिशा सतीश सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे हे दोघे चांगलेच अडचणीत सापडले आहे. दिंडोशी न्यायालयाने काल पोलीस चौकशी आधीच अटकेपासून संरक्षण देऊन मोठा दिलासा दिला आहे.(Narayan Rane, Nitesh Rane will be present police interrogation)

दिशा सालियन प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांना आज चौकशीसाठी मुंबईतील मालवणी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावे लागणार आहे. दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी त्यांना न्यायालयाने 10 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.

दिशा सलियान प्रकरणात राणेंनी केलेल्या वक्तव्यांनंतर महिला आयोगाच्या निर्देशानुसार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपल्याकडे असलेली माहिती आणि पुरावे पोलिसांना सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंच्या स्वीय सहाय्यकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

राणे पिता पुत्र शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात होणार हजर

नितेश राणेंच्या स्वीय सहाय्यकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

Mumbai police send notice to Union minister Narayan Rane, son in Disha Salian case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी