29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईहवामान खात्याकडून रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याकडून रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

टीम लय भारी

मुंबई :- हवामान खात्याकडून मुंबईत रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे (Raigad, Palghar Orange alert for heavy rains).

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.

‘चिपळूण शहराने पहिल्यांदाच पाहिला महाभयंकर पूर’

भाजपधार्जिण्या राज्यपालांच्या अंगणात काँग्रेसचे आंदोलन

२४ जुलै रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे (General rainfall is expected in Kolhapur district).

२५ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, पालघर, ठाणे, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.

Raigad, Palghar Orange alert for heavy rains
अतिमुसळधार पाऊस

‘अजितदादा दोन हाणा, पण आपला म्हणा’; कार्यकर्त्याचा जाहिरातीमधून माफीनामा

Mumbai News LIVE Updates: Landslides and floods kill at least five in Raigad district after heavy rains

२६ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. काळात तुरळक ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी