31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमुंबईबंडखोर सेना आमदाराला मुंबईत आल्यानंतर चार दिवसांनंतर दिसला मतदारसंघ!

बंडखोर सेना आमदाराला मुंबईत आल्यानंतर चार दिवसांनंतर दिसला मतदारसंघ!

टीम लय भारी 

मुंबई : मागठाणे मतदार संघाचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आज (दि.6 जुलै) आपल्या मतदार संघात परतणार आहेत, यावेळी त्यांचे समर्थक मोठे शक्तीप्रदर्शन करत त्यांचे स्वागत करणार आहेत. सेना आमदारांच्या बंडखोरीने सर्व सामान्य नागरिक, प्रशासनाला वेठीस धरले मात्र त्यावर व्यक्त न होता आपल्याच कर्तृत्वाची गाऱ्हाणी गाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दिसून येत आहे.

आमदार प्रकाश सुर्वे हे मागठाणे येथील आमदार जे शिंदे गटाच्या बंडखोरांना सामील झाले. सूरत, गुवाहटी, गोवा येथे इतर आमदारांसोबत अनेक दिवस पर्यटन करत राहिले. मतदारसंघातील लोक, लोकांच्या समस्या या सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपलाच मनसुबा पुर्ण करण्यासाठी ते आग्रही राहिल्याचे मागील काही दिवसांत दिसून आले. परंतु आता मुंबईत परतल्यानंतर आमदार साहेबांना कर्मभूमी अर्थात आपल्या मतदार संघात जाण्याचे वेध लागले आहेत.

दरम्यान आज संध्याकाळी पाच वाजता प्रकाश सुर्वे यांचे मागठाणे येथे आगमन होणार असून सुर्वे यांचे समर्थक, स्थानिक नागरिक आणि चाहते मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यावेळी मुखयमंत्री यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा या शक्तीप्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

प्रकाश सुर्वे यांचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, चाहते हे संजय गांधी नॅशनल पार्क ते हॉटेल गोकुळ अशी ‘आनंद रॅली’ काढणार असून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान ढोल – ताशांच्या गजरात मिरवणून काढून सुर्वे यांची मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार आहे. या स्वागत समारंभात दहा हजार लोक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांची “चुकीला माफी नाही” ही भावना केवळ आता शब्दांपुरतीच मर्यादित राहिली असून बंडखोरांचे त्याउलट कौतुक करण्यात येत आहे. केवळ स्वार्थापुरतं, मतदानापुरतंच लोकांना लक्षात ठेवण्याची ही वृत्ती मतदार संघातील लोकांना कधी कळणार हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. इतके दिवस मतदार संघाबाहेर राहून मजा मारणारे शिवसेना आमदार मुंबईत आल्यानंतर चार दिवसांनी मतदार संघात परतात आणि मतदार संघातील लोक जल्लोषात स्वागत करतात या विसंगतीला कोणी छेद देणार का असा मुद्दा सुद्धा यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

मुख्यमंत्री महापालिकेत आले, भाजप – सेना नेत्यांनी त्यांचा सत्कार केला

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु

शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी