29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबईमेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू!

मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू!

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पुन्हा डिवचले आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील पेटलेला वाद काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. उर्फीच्या एका व्हिडीओवरुन चित्रा वाघ यांनी उर्फीवर आगपखड करत मुंबईच्या रस्त्यावर ती नंगटपणा करत असल्याचा आरोप केला होता. उर्फीवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी करत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील केली होती. (Urfi Javed once again targets Chitra Wagh)

दरम्यान महिला आयोग उर्फीवर कारवाई करत नसल्यामुळे चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोग आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना देखील लक्ष्य केले होते. उर्फीवरुन पेटलेला वाद संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत कारण उर्फीने सोमवारी (दि. ९) देखील चित्रा वाघ यांना लक्ष करत ट्विटरवर तीन पोस्ट केल्या आहेत.

ट्विटरवर सलवार घातलेला फोटो पोस्ट करत उर्फीने ‘चित्रा वाघने मुझे सुंदर बना दिया’ असे म्हटले आहे. त्याच बरोबर आणखी एका ट्विटमध्ये तीने बॅकलेस ड्रेस घालून फोटो पोस्ट केला असून ‘लेकीन अभी भी बहोत सुंदर होना बाकी है, सॉरी चित्रा वाघजी आय लव्ह यु असे कॅप्शन देखील दिले आहे. उर्फीने एवढ्यावर न थांबता तीसरे ट्विट करत चित्रा वाघ यांना पून्हा डिवचले असून त्यात तिने ‘मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू’ असे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रस्त्यावर उर्फी जावेद स्पॉट झाली होती. यावेळी तीने घातलेल्या तोकड्या कपड्यांचा तो व्हिडीओ चित्रा वाघ यांनी ट्विट करत ”शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही असा सवाल करत. तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये” असे ट्विट केले होते. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात वाद पेटला उर्फीने देखील आपल्या ट्विटर अकाउंटवरुन चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला होता. आजच्या राजकारण्यांकडे पाहून खूपच वाईट वाटते. ”स्वत: लोकांच्या नजरेत येण्यासाठी ते मला टार्गेट करत आहेत. बलात्कारासाठी ते माझ्या कपड्यांवरुन दोषी ठरवणे त्यांना सोईचे वाटते. मात्र आणखी देखील मुद्दे आहेत. जसे की, बेरोजगारी, बलात्काराचे प्रलंबित खटले, खुन त्यांचे काय?” असा सवाल तीने केला होता.

हे सुद्धा वाचा

उर्फी जावेदच्या हातात अखेर बेड्या…

उर्फी सोबत महिला आयोगसुद्धा बेफाम झालाय का…; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली …म्हणून मला दोषी ठरवतात

त्यानंतर हा वाद पेटतच गेला चित्रा वाघ यांनी महिला आयोग उर्फीवर कारवाई करत नसल्याचा आरोप करत ”उर्फी जावेदप्रमाणे महिला आयोग देखील बेफाम झाला अशी म्हणायची परिस्थिती आज महाराष्ट्रातील महिलांवर आली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. स्वैराचाराला लगाम घालणे ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे”, असे एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यावेळी त्यांनी महिला आयोग आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव न घेता त्यांना देखील लक्ष्य केले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत महिला आयोगाने चित्रा वाघ यांना महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरमी नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. त्यावर चित्रा वाघ यांनी देखील मला येणाऱ्या ५६ नोटीसांमध्ये आणखी एका नोटीसीची भर असे म्हटले होते. त्यानंतर महिला आयोगाला आपण उत्तर दिले असून दिलेले उत्तर महिला आयोगाने प्रसिद्ध करावे असे आव्हान देखील त्यांनी दिले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी