33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटॉप न्यूजमाझी वसुंधरा अभियानात पाचगणी नगरपालिका ठरली मानकरी

माझी वसुंधरा अभियानात पाचगणी नगरपालिका ठरली मानकरी

टीम लय भारी

पाचगणी : पाचगणी हे पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. माझी वसुंधरा २०२१ मध्ये उल्लेखनीय कामगिरी बाबत पाचगणी नगरपालिका , मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर , नगराध्यक्ष लक्ष्मी कर्हाडकर हे मानकरी ठरले आहेत (my Vasundhara Abhiyan, Pachgani  municipality became a nominated).

पाचगणी नगरपरिषद हद्दीमध्ये हरित अच्छादान वाढविण्याच्या दृष्टीने रस्त्यांलगत तसेच मोकळया जागेत 7520 देशी प्रजातींच्या आवळा, वड, पिंपळ,जांभुळ, कांचन इ. सारख्या वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन करण्यात येत आहे.माझी वसुंधरा अभियानांतर्गत ” अर्बन ट्री क्लस्टर ” ही संकल्पना राबवत २.०० आर क्षेत्रांमध्ये स्थानिक प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

सातारच्या जान्हवी यांनी सिद्धासन आसनमध्ये केला 5 तासाचा नवा विश्वविक्रम

कंटेन्मेंट झोनमध्ये सभांना परवानगी नाही, सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या नव्या गाईडलाईन जारी

वृक्षांच्या मोफत उपलब्धतेसाठी वृक्ष बॅकेची स्थापना

पांचगणी शहरातील माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जुन्या ३ उद्यानांचे पुनर्जीवन तसेच कचरा डेपो येथे ” स्वच्छ भारत पॉईंट” नवीन उद्यान विकसित करण्यात आले आहे. पाचगणी नगरपरिषद मालकीच्या तीन STP मधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा हरित आच्छादन शाश्वत ठेवण्यासाठी पुनर्वापर.

पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आठवड्यातील, प्रत्येक गुरुवार ” सायकल डे ” म्हणून घोषित. तसेच नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच अभियानाच्या प्रसारासाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन. पाचगणी नगरपरिषदेमार्फत प्रत्येक महिन्यात शहराची वायू गुणवत्ता तपासणी करण्यात येते व गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी ६ TPD क्षमतेचा बायोमिथेनेशन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

शहरातील सर्व सोडियम व्हेपर दिवे एकूण १८१५ एल.ई.डी दिव्यांद्वारे बदलण्यात आले आहेत व त्याद्वारे विजेची बचत माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात वसुंधरा कक्ष तयार करण्यात आला आहे व त्या मार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

नागपुरात दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रद्द, संघाचे शस्त्रपूजनही मर्यादित लोकांमध्ये, हे आहे कारण

Maharashtra Calls Bandh To Support Farmers; Traders’ Body Says Won’t Join

अपारंपारीक उर्जा स्त्रोतांना चालना देण्याकरीता शहरातील नगरपरिषद इमारतीवर सोलर पॅनल तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे सोलर पॅनल तसेच पवन उर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत.त्याद्वारे विजेची बचत.माझी वसुंधरा अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी विविध ठिकाणी वॉल पेंटिंग माध्यमातून जनजागृती.पाचगणी नगरपरिषद मालकीच्या १३ विहरीच्या स्वच्छतेचे व पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्या करिता शहरामध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले होते. ” पर्यावरण पूरक गणेश स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.

माझी वसुंधरा अभियानात पाचगणी नगरपालिका ठरली मानकरी

नवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक माझी वसुंधरा अभियानाच्या व स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रचार प्रसिद्धीसाठी शहरामध्ये पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, चारोळी स्पर्धा, व लघुचित्रफीत स्पर्धा घेण्यात आल्या.सिंगल युज प्लास्टिक वापरावरील बंदी तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करण्याकरिता पथविक्रेता दिनाचे औचित्य साधून शहरातील व्यापारी यांची जनजागृती कार्यक्रम तसेच शहरामध्ये पथनाट्ये व इतर कार्यक्रमाद्वारे जनजागृती. अंतर्गत माझी वसुंधरा मित्र परिवार सदस्यांची संख्या एकूण १३,००० पेक्षा अधिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी