30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयनवाब मलिक कांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून मुंबईत चक्का जामचा इशारा

नवाब मलिक कांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून मुंबईत चक्का जामचा इशारा

टीम लय भारी

मुंबई: विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दि. ४ मार्च २०२२ रोजी चर्चगेट येथील के. सी. कॉलेज येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते  प्रविण दरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केले.(Nawab Malik Kan’s resignation BJP warns Chakka Jam Mumbai)

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे काम कोणी केले हे आपल्या समोर आले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांचा माननीय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत त्यांना ७ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्री यांनी घेतला नाही तर महाराष्ट्रातील जनता आता गप्प बसणार नाही.

 महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी ९ मार्च २०२२ रोजी विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या वतीने  ‘नवाब मलिक हटाव…मुंबई बचाव…’ असा एक विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

हे सुद्धा वाचा

Pravin Darekar : प्रविण दरेकरांची संजय राऊतांसह काँग्रेस-शिवसेनेवर सडकून टीका

मुंबईत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात

राऊतांकडून वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न , प्रवीण दरेकर

Bombay HC issues notice to state govt in plea by BJP leader Pravin Darekar seeking to quash FIR

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, भायखळा परिसरातील वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा एक  मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपा पक्षासोबतच मुंबईसह महाराष्ट्रातील जनता देखील नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून या मोर्चात सहभागी होणार आहे, असे मत प्रविण दरेकर यांनी त्यावेळी व्यक्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी