35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयउपमुख्यमंत्र्यांचे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी राज्यपालांना साकडं

उपमुख्यमंत्र्यांचे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी राज्यपालांना साकडं

टीम लय भारी

मुंबई : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी परवानगी देण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोषारी यांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्ष निवडी संदर्भातील निवेदन काल राज्यपालांना सादर करण्यात आले.(Deputy Chief Minister’s Assembly Speaker will be elected by the Governor)

अर्थसंकल्पीय काळात विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त ठेवणे योग्य नाही. यासाठी एक तारीख द्यावी व राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्नही सोडवावा अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे राज्यपालांना करण्यात आली आहे. यावेळी १२ आमदारांनी केलेल्या गैर वर्तनाबद्दल जेव्हा त्यांचे निलंबन करण्यात आले तेव्हा न्यायालयाने तुम्ही १ वर्षांसाठी असं निलंबन करू शकत नाही असा निर्णय दिला होता. याच निर्णयाचा आरसा दाखवून जो १२ आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे त्याला लवकरात लवकर सोडवण्याची मागणी अजित पवार यांनी राज्यपालांना केली आहे.

लोकशाही पध्दतीने ठराव करून व नियमावलीच्या अधीन राहून १२ नावे देण्यात आलेली आहेत. या दोन गोष्टींवर राज्यपालांनी आम्हाला वेळ दिला, असे पवारांनी सांगितले आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पाच दिवसांचे न ठेवता त्याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. या कालावधीत विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवणे हे अशोभनियीय आणि नियमांच्या चौकटीत न बसणारे ठरेल असं म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

विधानसभेत सोमवारी ओबीसी आरक्षणावर बिल आणणार, उपमुख्यमंत्री

सेवानिवृत्त अधिका-यांच्या नेमणूक रद्द न करता राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलेले लक्ष्य

अजितदादांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचं हट्ट !

Maha CM feels no need for Malik to quit now: Ajit Pawar before House session

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी