29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयसमीर वानखेडेंचं सर्टिफिकेट जात पडताळणी समितीला पडताळणीसाठी देणार : नवाब मलिक

समीर वानखेडेंचं सर्टिफिकेट जात पडताळणी समितीला पडताळणीसाठी देणार : नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आम्ही जात पडताळणी समितीसमोर देणार आहोत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच समीर वानखेडेंच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट दाखवलं जात आहे. वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट दाखवण्यापेक्षा समीर यांनी त्यांचं स्वत:चं सर्टिफिकेट दाखवावं, असं आव्हानच नवाब मलिक यांनी दिलं आहे (Nawab Malik targets NCB officer Sameer Wankhede).

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. एखादा दलित व्यक्ती गावखेड्यात अभ्यास करत असेल. या खोट्या दाखल्यामुळे त्याची संधी हुकली. जो व्यक्ती बनावट जन्म तारीख तयार करून शेड्यूल कास्टच्या कॅटेगिरीत नोकरी मिळवतो. त्याच्यामुळे इतरांची संधी हुकली आहे. आम्ही दिलेले बर्थ सर्टिफिकेट असली आहे. त्यावर त्याच्या वडिलांचं नाव दाऊद असं आहे. त्यानंतर या सर्टिफिकेटवर अल्टरेशन करण्यात आलं, असं मलिक यांनी सांगितलं.

समीर वानखेडे आपल्या मर्यादा ओलांडत आहेत : नवाब मलिक

आमची लढाई एनसीबीशी नाही : नवाब मलिक

समीर यांचे वडील मुस्लिम म्हणून जगले

मुंबईत लोकांचे बर्थ सर्टिफिकेट सर्च करून मिळवता येतं. वानखेडेच्या बहिणीचं सर्टिफिकेट इंटरनेटवर आहे. पण समीर वानखेडेचं नाही. आम्ही खूप शोधल्यानंतर आम्हाला हे सर्टिफिकेट मिळालं. ज्ञानेश्वर वानखेडे जन्माने दलित आहेत. त्यांनी दलित असल्याचं सर्टिफिकेट घेतलं. नोकरी मिळवली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि धर्मांतर केलं. त्यानंतर ते आयुष्यभर मुस्लिम म्हणून जगले. त्यानंतर समीर वानखेडेंनी वडिलांच्या सर्टिफिकेटचा आधार घेऊन सर्टिफिकेट घेतलं. आम्ही या प्रकरणी दलित संघटना आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत.

शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट बनवून नोकऱ्या मिळवल्या गेल्या. त्याच्या या पूर्वी तक्रारी आल्या. त्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी जात पडताळणी समिती स्थापन करण्यात आली. पण केंद्राकडे अशी कमिटी नाही. केवळ जिल्हाधिकाऱ्याकडून प्रमाणपत्रं मिळवलं जातं. आता या व्हॅलिडेशन कमिटी समोर हे सर्टिफिकेट तपासण्याची मागणी करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

समीर वानखेडे, जास्मीन वानखेडेंनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, नवाब मलिकांचा आरोप

NCP’s Nawab Malik vs NCB’s Sameer Wankhede: A ‘personal’ feud in Aryan drug case

तुमचं खरं सर्टिफिकेट दाखवा        

खोटं सर्टिफिकेट दिल्यास दोन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. स्क्रुनिटी कमिटीकडे तक्रार केली जाणार आहे. मी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे तर तुमचं असली सर्टिफिकेट जाहीर करा. वडिलांचं सर्टिफिकेट दाखवलं जात आहे. पण वानखेडेंनी त्यांचं सर्टिफिकेट दाखल करावं, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी