28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजपंकजाताईंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण फडणविसांना नाही दिल्या

पंकजाताईंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण फडणविसांना नाही दिल्या

टीम लय भारी

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे, चार दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस होता. पण पंकजाताई मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या नाहीत ( Pankaja Munde given birthday wishes to Uddhav Thackeray but not to Devendra Fadnavis ).

पंकजाताई मुंडे यांचा ता. २६ रोजी वाढदिवस होता. पण फडणवीस यांनीही पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नसल्यामुळे पंकजाताई आणि देवेंद्र फडवीस यांच्यामधील दरी वाढत चालली असल्याचे दिसत आहे ( Gap increased between Pankaja Munde and Devendra Fadnavis ).

पंकजाताई व फडणवीस यांच्या दोघांचे ट्विटर अकाऊंट पाहिल्यानंतर दोघांमध्ये एकमेकांबद्दल नाराजी असल्याचे दिसून येत आहे. पंकजाताईंनी उद्धव ठाकरे, विनोद तावडे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, राजनाथ सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

( Pankaja Munde given birthday wishes to Vinod Tawde, Raj Thackeray, Aditya Thackeray,  Rajnath Singh )

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. २२ जुलै रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस होता. दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्याचे ट्विटरवर दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीपासून पंकजाताई मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील दरी रूंदावताना दिसत आहे. पक्षांतील लोकांनीच माझा पराभव केला असे वक्तव्य पंकजाताईंनी केले होते. विधानपरिषदेवरही फडणवीस यांनी पंकजाताई यांना संधी दिली नाही.

हे सुद्धा वाचा

Pankaja Munde : पंकजा मुंडे केंद्रात जाण्यास अनुत्सुक, समर्थकही नाराज

Gopinath Munde death Anniversary : गोपीनाथ मुंडे पोळी – रस खाऊन गेले, अन् परत आलेच नाहीत, पंकजाताईंनी जागवल्या आठवणी

एवढेच नव्हे तर, राज्याच्या कार्यकारिणीमध्येही पंकजा मुंडे यांना स्थान दिलेले नाही. देवेंद्र फडणवीस हे पंकजाताईंना वारंवार डावलत असल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडेंनीही याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे ( Dispute between Pankaja Munde and Devendra Fadnavis ).

Mahavikas Aghadi

विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. ‘कोरोना’च्या काळात पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले होते. देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत असताना पंकजा मुंडे यांनी केलेले कौतुक फडणवीस यांना रूचले नव्हते असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी