29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पुन्हा पत्ता कट !

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पुन्हा पत्ता कट !

टीम लय भारी

मुंबई: भाजपाने विधान परिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर केली आहे. यंदा भाजपकडून विधान परिषदत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. भाजपकडून पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) नाव नाही. प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून उमा खापरे तसंच श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. दरम्यान भाजपच्या तिसऱ्या जागेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र पंकजा मुंडे यांना त्यावेळी हुलकावणी देण्यात आली होती.राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20  जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा: 

काम हीच आपली ओळख म्हणजे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी : आमदार रोहित पवार

Maharashtra: Pankaja Munde not fielded for MLC polls

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी