28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयहिंदुत्त्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण? संजय राऊत यांचा सवाल

हिंदुत्त्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण? संजय राऊत यांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : 2014 पासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करण्यात आला. हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा जोरदार हल्लाबोल सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेलाही यावेळी जोरदार प्रत्यूत्तर दिले(Sanjay Raut on Monday lashed out at BJP over hindutva).

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शाब्दिक तोफ डागली.

‘आतापर्यंत सत्य आणि न्याय याचीच गर्जना घुमली आहे. अमित शाह रविवारी पुण्यात आले त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं ते पूर्णपणे असत्याला धरुन होतं. ते नेमकं खरं काय बोलले हेच आम्हीही शोधत होतो’, असं ते म्हणाले.आमचं सरकार, आमच्या भूमिका आणि आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करुन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेचा मागच्या दोन- अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरु असूनही जनता विश्वास ठेवायला तयार नाही, असा सणसणीत टोला त्यांनी भाजपला टोला लगावला.

पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर भारतीय जनता पार्टीचा पराभव करावा लागेल : संजय राऊत

या बद्दल राऊतांनी व्यक्त केला संताप

राज्यातील काही नेत्यांसोबतच हे वैफल्य  केंद्रातील मंत्र्यांच्या तोंडूनही ऐकू आलं, असं म्हणत अमित शाह वैफल्यग्रस्त असल्याच्या आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आम्हा सगळ्यांना त्यांची दयाही आली आणि आश्चर्यही वाटलं.

हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडलेला नाही…

हिंदुत्त्वाचा मुद्दा शिवसेनेनं सोडला नाही आणि सोडणारही नाही. 2014 साली शिवसेनेला दूर करा हे खासगीत सांगणारे कोण होते हे शाह यांनी स्पष्ट करावं असा इशारा राऊतांनी दिला. 2014 पासून हिंदुत्त्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण, याचं उत्तर शाह यांनी पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत द्यावं… अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. राज्यातील सरकार उत्तम सुरु आहे आणि तुमच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत अशा शब्दांत त्यांनी अमित शाह यांना टोला लगावला. सीबीआय, एनसीबी सारख्या चिलखतांचा वापर करत तुम्ही जे वार करताय त्यापेक्षा समोरुन लढा या शब्दांत मागच्या काही महिन्यांतील परिस्थितीवर त्यांनी कटाक्ष टाकला.

दिल्लीत आज पुन्हा सोनिया, पवार, राऊतांची बैठक, नेमका अजेंडा काय?

Mumbai l Sanjay Raut hits out at Amit Shah, says it was BJP that ditched Shiv Sena in 2014 for larger share in power

दरम्यान, रविवारी पुण्यात आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकताना शाह यांनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा लढवून दाखवा असं केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरलं होतं. मात्र शिवसेनेनं दगा दिला. आम्ही जे बोलतो ते करतो. त्यात आम्हाला अजिबात संकोच नाही असा टोला त्यांनी लगावला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी