30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रशाहजी बापूंचा ‘मुका‘ घ्या ‘मुका‘

शाहजी बापूंचा ‘मुका‘ घ्या ‘मुका‘

टीम लय भारी

मुंबईः शिवसेनेचे बंडखोर आमदार शाहजी बापूंच्या डायलाॅगची आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाची सगळयांनाच भुरळ पडली आहे. मुंबईतल्या एका कार्यकत्र्याने बापूंचा चक्क ‘मुका‘ घेतला. त्यामुळे शाहजी बापू किती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. हे आधोरेखीत झाले आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

शाहजी बापूंचा ‘मुका‘ घेणारा कार्यकर्ता हा पुण्यातील एक उदयोजक असल्याचे समजते. त्यांचा हा फोटो मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे दादा कोंडकेच्या ‘मुका‘ घ्या ‘मुका‘ चित्रपटातल्या कॅप्शन घेवून शाहजी बापूंना सोशल मीडियावर रोल करायला सुरुवात झाली आहे. राज्यातले सत्ता नाटय थंड झाले असले तरी शाहजी बापूंच्या डायलाॅगची भूरळ मात्र कमी झालेली नाही.

काय डोंगार…काय झाडी…काय…हाटेल…ओक्के…मधी हाय हा शिवसेनेचे आमदार शहाजी बापूंचा डायलाॅग म्हणजे चर्चेचा एक विषय ठरला. या तीन ओळींनी तरुणाईला भुरळ पाडली. या तीन ओळी लोकांच्या तोंडावर अक्षरशः रेंगाळत आहेत. सोशल मीडियावर या ओळीनी धुमाकूळ घातला आहे. या ओळींवर लाखोंनी कमेंटस केल्या आहेत. या ओळींच्या तालावर, चालीवर अनेकांनी आपल्या गाण्यांच्या रचना केल्या. या गाण्याच्या ओळी अक्षरशः डोक्यात गेल्यात.

अनेकांनी बापूंच्या या ओळींवर मिक्शिल शब्दात टीका देखील केली आहे. अजित पवारांनी तर भर सभेत त्यांच्या ओळी बोलून दाखवत त्यांची कानउघडणी केली होती. या ओळी एक प्रकारे मजेचा विषय बनल्यात. लोक या ओळींचा आनंद घेत आहेत.

हे सुध्दा वाचा:

आता राॅकेलप्रमाणे पेट्रोल होणार इतिहास जमा

आता समृध्दी महामार्ग आणखी सुसाट होणार

ब्रेकिंग : हवामान खात्याचा मुंबईकरांना ‘रेड अलर्ट’, दुपारनंतर ‘मुसळधार’चा जोर वाढवणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी