35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईब्रेकिंग : हवामान खात्याचा मुंबईकरांना 'रेड अलर्ट', दुपारनंतर 'मुसळधार'चा जोर वाढवणार

ब्रेकिंग : हवामान खात्याचा मुंबईकरांना ‘रेड अलर्ट’, दुपारनंतर ‘मुसळधार’चा जोर वाढवणार

टीम लय भारी 

मुंबई : मुंबईकरांसाठी हवामान खात्याने आज ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दुपारी एक नंतर पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी त्यानुसार आपल्या प्रवास आणि इतर नियोजन करावे, अशा हवामान खात्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. याविषयी मुंबई महापालिकेने सोशल मिडीयावर पोस्ट करत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबई महापालिकेने ट्विट करत मुंबईकरांना आजच्या पावसाचा अलर्ट दिला आहे. ट्विटमध्ये बीएमसी लिहिते, “हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज दुपारी एक वाजल्यापासून पुढे 24 तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कृपया मुंबईकरांनी त्याप्रमाणे आपला प्रवास आणि इतर नियोजन करावे”, असे महापालिकेने म्हटले आहे.

गेले दोन – तीन दिवस मुंबई आणि मुंबई उपनगरांत पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसून येत आहे. दरम्यानआज हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे मुंबईकरांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

मोठी बातमी : एकनाथ शिंदे म्हणाले, OBC आरक्षण ठिकविण्यासाठी माझे आणि फडणविसांचे मजबूत नियोजन

भाजपच्या लाडक्या बंडखोर आमदाराने हिंदुत्ववादी फडणवीसांना बनवले ख्रिश्चन

‘दलित पँथर’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी