33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयशरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीत नवे आर. आर. पाटील उदयाला येत आहेत

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीत नवे आर. आर. पाटील उदयाला येत आहेत

टीम लय भारी

मुंबई : गळ्याभोवती लपेटलेल्या सोन्याच्या साखळ्या, बोटांमध्ये अंगठ्या, हातात महागडे मोबाईल अन् अलिशान गाड्या… अशा मिजाशीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी वावरत आहेत. आपला पक्ष गुंडांचा आहे की काय, हे संतप्त उद्गार आहेत, खुद्द शरद पवार यांचे. जमिनीवर पाय असलेल्या, अन् जनतेशी नाळ जोडलेल्या कै. आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांची पक्षाला गरज आहे. सध्या पक्षात असा एक नेता उद्याला येतोय. त्याचे नाव निलेश लंके. लंकेंचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला हवा, असे उद्गारही पवार यांनी काढले(Sharad Pawar said, the new R. R. Patil is coming up).

आपला पक्ष कष्टकरी, शेतमजूर, कामगार, असंघटीत क्षेत्रातील लोकं यांना आपलासा वाटावा अशी पक्षाची छबी असायला हवी. सर्वसामान्यांच्या मनात पक्षाबद्दल सहानुभूती तयार व्हायला हवी. तशा पद्धतीचे काम आपण करायला हवे. पण तसे काम होत नाही, अशी खंतही पवार यांनी यावेळी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच एक गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांनी आमदार लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली(During the meeting, Pawar praised MLA Nilesh Lanke).

Sharad Pawar said, the new R. R. Patil is coming up
बैठकीत पवार यांनी आमदार लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळली

आगामी मंत्रीमंडळाच्या विस्तारात निलेश लंकेना मंत्रीपद मिळू शकते याचे संकेतही पवार यांनी दिल्याचे समजते.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडेंनी शायरीतून दिल्या शरद पवारांना शुभेच्छा ,काळजी घेण्याचं केलं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान करणे दुर्दैवी ,सुप्रिया सुळे

बाप-लेकीचं नातंच वेगळं! बाबांच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे…

PM Modi Hails Sharad Pawar’s Positive Politics, Asks Congress Leaders To Learn From Him

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी