33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीय'दिल्लीचे पोलीस मुंबईतून अतिरेक्यांना अटक करीत होते, तेव्हा महाराष्ट्र ATS झोपा काढत...

‘दिल्लीचे पोलीस मुंबईतून अतिरेक्यांना अटक करीत होते, तेव्हा महाराष्ट्र ATS झोपा काढत होते का ?’

टीम लय भारी

मुंबई : देशात घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. दिल्लीचे पोलीस मुंबईतून अतिरेक्यांना अटक करीत होते, तेव्हा महाराष्ट्र ATS झोपा काढत होते का ? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे (Ashish Shelar has targeted the government).

पोलिसांवर राजकीय दबाव आहे म्हणून अशा गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप ही शेलार यांनी केला आहे. मुंबईत शेलारांनी पत्रकारांशी सवांद साधला होता यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे पोलीस, पत्रकारांना हात नाही पाय लावू अशा प्रकारची भाषा करणारे पोलीस, आमदाराला लूक आऊटची नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलीस दहशतवाद्यांच्या बाबतीत झोपले होते का? याचे स्पष्टीकरण गृहमंत्री देतील का? असा सवाल ही त्यांनी केला आहे.

अनिल परब यांच्यावर सीबीआय चौकशी लावावी – आशिष शेलार

Ashish Shelar : करोना काळात पालिकेत भ्रष्टाचार?; भाजपचा महापौरांवर गंभीर आरोप : आशिष शेलार

सरकारने आता बैठका घेतल्या तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्ष्यावर सरकारला पांघरून घालता येणार आहे. आपले मुंबई पोलीस सक्षम आहेत परंतु, राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलीबाजी आणि सौदेबाजी या मुळे ही पोळीउसांची ही स्थिती आली असेल असे शेलार म्हणाले.

Ashish Shelar : ‘विकास योजनांबाबत का शत्रूसारखे वागताय ?’, भाजपा नेते आशिष शेलार यांचा CM ठाकरे यांना सवाल

BJP’s Ashish Shelar Alleges Rs 1,000 Cr ‘Scam’ in Mumbai’s Coastal Road Project

या संदर्भात सरकारने चौकशी वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली बाजू मांडवावी असे आवाहन शेलार यांनी या वेळी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी