35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयमुंडे भगिनी पक्षावर नाराज असलेल्या चर्चेला पंकजाताई मुंडे यांनी पूर्णविराम लावला

मुंडे भगिनी पक्षावर नाराज असलेल्या चर्चेला पंकजाताई मुंडे यांनी पूर्णविराम लावला

टीम लय भारी

मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळाचे विस्तारानंतर, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून डॉ. प्रीतमताई मुंडे यांचे नाव वगळण्यात आले. यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चांना भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी पूर्णविराम लावला आहे. मुंडे भगिनी पक्षावर नाराज नाहीत असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत (BJP leader Pankaja Munde has said that Munde is not angry with Bhagini Party).

पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पंकजाताई मुंडे काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्व प्रथम पंकजाताई मुंडे म्हणाल्या मी आणि प्रीतमताई मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असे सांगत पंकजा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होते, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.

मुंडे भगिनी केंद्रीय भाजपवर नाराज नाहीत; उगाच त्यांना बदनाम करू नका; देवेंद्र फडणवीस

प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून प्रीतमताईंचे नाव वगळले!

केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढले होते. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते. त्यामुळे आम्ही मुंबईतच असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतेही पद द्यायचे असेल तर मुंडे कुटुंबाचे नाव चालते. त्यामुळे आमचे नाव चालले. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती, असे पंकजा यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी मंत्र्यांचे अभिनंदन का केले नाही याचंही कारण सांगितले. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हते. त्यामुळे मी कुणाचेही अभिनंदन केले नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचेही अभिनंदन करते, असे त्या म्हणाल्या. मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचे अभिनंदन केले. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचे आणि दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले होते, असेही त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर का गेले तीन महिन्याच्या सुट्टीवर; जाणून घ्या

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/shiv-sena-its-a-ploy-to-finish-pankaja-mundes-political-career/articleshow/84261504.cms

BJP Pankaja Munde has said that Munde is not angry
पंकजा मुंडे

भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात. सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत. केवळ प्रीतम यांचेच नाही तर हिना गावित यांचे नावही चर्चेत होते. पण नवीन लोकांनना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे, असे सांगतानाच प्रीतम ताईंचे नाव चर्चेत होते आणि योग्य होते. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असे पंकजाताई मुंडे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी