30 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयप्रकाश आंबेडकर का गेले तीन महिन्याच्या सुट्टीवर; जाणून घ्या

प्रकाश आंबेडकर का गेले तीन महिन्याच्या सुट्टीवर; जाणून घ्या

टीम लय भारी

मुंबई :-  एखादा नेता तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर जाण्याची घटना फार कमी प्रमाणात घडते. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर गेले आहेत. याचे कारण असे आहे की, प्रकाश आंबेडकर यांची बायपास सर्जरी करण्यात आली आहे (Why did Prakash Ambedkar go on a three-month leave).

काल प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ ट्विट करून तीन महिने कार्यरत राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आंबेडकर का तीन महिने कार्यरत राहणार नाही हा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळाले आहे. प्रकाश आंबेडकर यांची बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळेच ते तीन महिने विश्रांती घेणार आहेत. या दरम्यान आंबेडकर कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत (Ambedkar will not attend any political or public events).

रोहित पवारांनी मानले केंद्र सरकारचे आभार

आम्हाला सुध्दा आरेला कारे करता येत; चित्रा वाघ यांचा राऊतांना इशारा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असे रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आंबेडकरांना कोणत्या रुग्णालयात आणि कुठे दाखल करण्यात आले आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

कोव्हॅक्सीनची तिसरी मात्रा आणि गरज

https://english.lokmat.com/maharashtra/vba-chief-prakash-ambedkar-undergoes-bypass-surgery/

प्रकाश आंबेडकर यांनी त्याच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यातून त्यांनी अशी माहिती दिली आहे की मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या संपूर्ण काळात मी कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही. व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याकाळात पक्ष चालला पाहिजे, संघटन देखील चालले पाहिजे. पाच जिल्ह्यामध्ये निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा आहे. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकात विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे, असे आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हणाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी