33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनविवाहबंधनात अडकली तापसी पन्नू, जाणून घ्या कोण आहे तिचा पती मॅथियास बो

विवाहबंधनात अडकली तापसी पन्नू, जाणून घ्या कोण आहे तिचा पती मॅथियास बो

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) विवाह बंधनात अडकली आहे. होळीचा दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे आता सर्वांना याबाबत समजले आहे. तापसी पन्नू आणि तिच्या प्रियकर मॅथियास बो 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतांनाच आता या दोघांची दुसरी फोटो समोर आली आहे, या फोटोत तापसी आणि मॅथियास दोघेही दिसत आहेत. (Taapsee Pannu married, know who is her husband Mathias Bo)

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) विवाह बंधनात अडकली आहे. होळीचा दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे आता सर्वांना याबाबत समजले आहे. तापसी पन्नू आणि तिच्या प्रियकर मॅथियास बो 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतांनाच आता या दोघांची दुसरी फोटो समोर आली आहे, या फोटोत तापसी आणि मॅथियास दोघेही दिसत आहेत. (Taapsee Pannu married, know who is her husband Mathias Bo)

लग्नाच्या चर्चेत तापसी बॉयफ्रेंड मॅथियासच्या रंगात रंगली; पाहा फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, तापसी आणि मॅथियासच्या लग्न सोहळ्यात त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीय मित्र परिवार उपस्थित होता..या दोघांचं लग्न शीख आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने पार पडल्याचे बोलले जात आहे. (Taapsee Pannu married, know who is her husband Mathias Bo) हा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता. 20 मार्चपासून लग्नाशी संबंधित कार्यक्रम सुरू झाले होते. तापसीने बॉलीवूड सेलेब्सला आपल्या लग्नात बोलवले नाही. तापसीने केवळ अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लो यानांच आमंत्रित केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavail Gulati (@pavailgulati)

तुम्हाला सांगते की, तापसी आणि मॅथियास बो  मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने  2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.  2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. इतकेच नव्हे तर  मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा  प्रशिक्षक आहे. सोशल मीडियावर तापसीची बहीण शगुन आणि तिच्या चुलत बहिणीसोबतचा फोटो शेअर करून या जोडप्याच्या लग्नाबाबतचे संकेतही दिले.

आलिशान घर, गाड्या अन्… कंगना रणौत आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण

तापसीचा जन्म दिल्लीच्या एका पंजाबी कुटुंबात झाला आणि चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती सॉफ्टवेअर प्रोफेशनमध्ये होती, परंतु त्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले आणि नंतर ती अभिनेत्री बनली. तापसीने कम्प्युटर विज्ञान अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण केली आणि सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. यासोबतच तिने व्ही चॅनलच्या टॅलेंट शो गेट गॉर्जियससाठी मुलाखत दिली, त्यानंतर ती मॉडेलिंग आणि नंतर अभिनय क्षेत्रात आली. रिलायन्स ट्रेंड्स, रेड एफएम 93.5, कोका कोला, मोटोरोला, पँटालून, पीव्हीआर सिनेमा, डाबर आणि वर्धमान यांसारख्या अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली.

तापसीने 2010 मध्ये झुम्मंडी नादम या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, यावेळी तापसी केवळ 22 वर्षांची होती. यासोबतच तापसीने तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले, तिच्या तमिळ चित्रपट आदुकलमने 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले.

जान्हवी कपूर अन् तिरुमला मंदिराचं आहे खास कनेक्शन; अभिनेत्रीनेच केलाय खुलासा

यानंतर 2013 मध्ये तापसीने चश्मे बद्दूर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.  तिच्याशिवाय या चित्रपटात सिद्धार्थ, अली जफर आणि ऋषी कपूर होते. 2015 मध्ये, तापसीला अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिने बेबी या चित्रपटात काम केले, ज्यामध्ये तिने अंडरकव्हर एजंट शबाना खानची भूमिका केली होती. यासोबतच तापसीने तमिळ चित्रपटांमध्येही काम सुरू ठेवले. यानंतर, 2016 मध्ये, ती पिंक चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि क्रिती कुल्हारी होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी