31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन; रोहित पवारांकडून रोहित पाटीलांचे अभिनंदन

शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन; रोहित पवारांकडून रोहित पाटीलांचे अभिनंदन

टीम लय भारी

सांगली:  राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची राजकारणात दणक्यात एन्ट्री झाली आहे. सांगलीतील कवठेमहंकाळमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहित पाटील यांना नेत्रदीपक विजय मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वत: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा. रोहित पवार यांनी दिल्या आहेत(Congratulations to Rohit Patil from Rohit Pawar)

राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती. रोहित पाटील यांनी जोरदार भाषणं करत विरोधकांना नामोहरण केलं होतं. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला 10, तर शेतकरी विकास पॅनलला 6 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं उत्तर : म्हणाले, एक कमळसुद्धा उभं केलं नाही

कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांची एकहाती सत्ता

शिवसेनचा धक्का, नितेश राणेंच्या हातून देवगडमधून गेली सत्ता

Third-wheel in Maharashtra, Congress might not be part of NCP-Shiv Sena alliance in Goa, hints Sanjay Raut

या विजयानंतर आर. आर. पाटील यांच्या मातोश्री आणि रोहित पाटील यांच्या आजी भागिरथी पाटील यांनी रोहित यांचं औक्षण केलं. हाच फोटो ट्विट करत रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी रोहित पाटील यांना दिल्या आहेत.

या निकालानंतर रोहित पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. कवठेमहंकाळमधील पाणी प्रश्न अजूनही काही ठिकाणी कायम आहे. त्याच प्रश्नावर सुरुवातील सोडवण्यासाठी आम्ही आधीच काम करायला सुरुवात केली होती. आताही तेच काम सगळ्यात आधी तेच काम पूर्ण करण्यासाठी झटणार आहोत, असं रोहित यांनी सांगितलं. आपला विजय हा लोकांमुळेच शक्य झाला असून या विजयाचं श्रेयदेखील रोहित पाटील यांनी त्यांनाच दिलंय.

या निवडणुकीच्या प्रचारात रोहित पाटील यांची तोफ धडाधडताना पहिल्यांदाच दिसली. रोहित पाटील यांनी आक्रमक भाषणं करून विरोधकांना नामोहरम केलं. निवडणूक प्रचारातील त्यांची भाषणंही चांगलीच चर्चेचा विषय झाली. खासकरून त्यांनी विरोधकांना त्यांचा बाप दाखवण्याचं केलेलं विधान तर अधिकच चर्चेत ठरलं. यावेळी अनेकांना आरआर आबा पाटील यांची छबीच रोहित यांच्यात दिसत होती. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान, या विरोधकांच्या वक्तव्यांना उत्तर देताना विरोधकांना निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असं विधान केलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी