29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमुंबईराज्यपालांसोबत चर्चा, आता पुढील निर्णय आम्ही घेऊ : चंद्रकांत पाटील

राज्यपालांसोबत चर्चा, आता पुढील निर्णय आम्ही घेऊ : चंद्रकांत पाटील

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांसोबत आम्ही चर्चा केली आहे. सरकार स्थापन करण्यास उशीर होत आहे. त्या अनुषंगाने घटनात्मक तरतुदींबाबत राज्यपालांसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार आता आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली.

चंद्रकांत पाटील यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रासप, रयत, शिवसंग्राम ही महायुती झाली होती. या महायुतीला स्पष्ट जनादेश मिळालेला आहे. महायुतीचे सरकार स्थापन व्हावे अशी लोकांची इच्छा आहे. पण काही कारणास्तव उशीर होत आहे. त्या अनुषंगाने आम्ही राज्यपालांकडे कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानुसार आता आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत.

पुढील कोणता निर्णय घेणार याची माहिती मात्र चंद्रकांत पाटील यांनी दिली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी