32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयआश्चर्यम् : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने गोपीचंद पडळकरांचा केला सत्कार

आश्चर्यम् : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने गोपीचंद पडळकरांचा केला सत्कार

टीम लय भारी

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. परंतु राष्ट्रवादीच्याच एका नगरसेवकाने पडळकर यांना सन्मानाने आपल्या घरी बोलावून त्यांचा सत्कार केला आहे ( NCP corporator felicitated to Gopichand Padalkar ).

टीमू एडके असे या नगरसेवकाचे नाव आहे. जत नगरपरिषदेमध्ये ते राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. एडके यांनी शुक्रवारी पडळकर यांना आपल्या घरी सन्मानाने निमंत्रित केले. पुष्प देवून त्यांचा सत्कार केला. एवढेच नव्हे तर, एडके यांच्या पत्नीने पडळकर यांचे औक्षण सुद्धा केले.

आश्चर्यम् : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने गोपीचंद पडळकरांचा केला सत्कार

गोपीचंद पडळकर यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यांना बांगड्या भरू. त्यांच्या तोंडाला काळे फासू असे इशारे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. पण राष्ट्रवादीच्याच नगरसेवकाने पडळकरांचा सत्कार केल्याने हे इशारे पोकळ निघाल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार म्हणाले, ‘गोपीचंद पडळकरांविषयी मला बोलायचे आहे, पण…’

गोपीचंद पडळकरांची भूमिका ‘मोडेन पण वाकणार नाही’

गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर नेतेही संतापले

नगरसेवक टीमू एडके जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी पडळकरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते कट्टर पडळकर समर्थक आहेत. लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा उघड प्रचार केला होता. आताही पडळकरांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगडोंब उसळला आहे, पण त्याची पर्वा न करता त्यांनी पडळकरांना सन्मानाचे स्थान दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Moneyspring

गोपीचंद पडळकर यांना घराबाहेर फिरू देणार नाही असा राष्ट्रवादी काँग्रेसने इशारा दिला होता. या इशाराला प्रती आव्हान देत पडळकर यांनी शुक्रवारी जत व आटपाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये झंझावाती दौरे केले ( Gopichand Padalkar visits to villages ) . पडळकर जतमध्ये येणार असल्याचे समजताच एडके यांनी त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले.

Mahavikas Aghadi

पडळकर सुरूवातीला माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कार्यालयात गेले. जगताप यांचा पाहूणचार घेऊन नंतर ते एडके यांच्याकडे गेले. पण ‘जगताप यांच्याकडे जाण्याच्या अगोदर तुम्ही माझ्याकडे यायला हवे होते’ अशी भावनाही एडके यांनी पडळकरांकडे व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी