33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटॉप न्यूजराज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर कोरोनाचा प्रवेश

राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर कोरोनाचा प्रवेश

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाचा सर्वत्र थैमान सुरु असताना कोरोनाने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाली होती. आता राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने हे सुरक्षारक्षक करोनामुक्त झाले. पण आता राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

कृष्णकुंजपासून काही अंतरावर असणाऱ्या शिवसेना भवनातही करोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर शिवसेना भवनात सॅनिटायझेशन प्रक्रीया करण्यात आली होती. तसेच शिवसेना भवन एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कृष्णकुंजमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना कोरोना झाल्यामुळे ठाकरे कुटुंबियांची चिंता वाढली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी