29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीय'गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा'

‘गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा’

राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत. आगामी निवडणुकांपूर्वीच प्रचारांचे वारे वाहू लागले आहे. सत्तासंघर्षासाठी राजकीय नेते जाती-धर्मात राजकारण करत असल्याचे पुन्हा एकदा नव्याने दिसू लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या दिपोत्सवाला गीतकार जावेद अख्तर आणि सलीम खान (Javed Akshtar And Salim Khan)  यांना अमंत्रित केले होते. यावरून भाजप नेते आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका केली. यावेळी ते भाजपच्या दिपोत्सवात बोलत असताना आम्ही गायिका उत्तरा केळकरांच्या उपस्थितीत उद्घाटन करत आहे. आता मराठीचा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे. यावर आता (mns) मनसे नेते संदीप देशपांडेंनी (Sandip deshpande) प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं काय घडलं?

(९ नोव्हेंबर) या दिवशी राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा दिपोत्सव समारंभ शिवाजी पार्क मैदानावर सुरू करण्यात आला असून यावेळी या दिपोत्सवासाठी जावेद अख्तर आणि सलीम खान उपस्थित होते. यांनीच या समारंभाचे उद्घाटन केले. यावरून आता आशिष शेलारांनी ‘आम्ही गायिका उत्तरा केळकरांच्या उपस्थितीत उद्घाटन करत असून हीच भाजपची संकल्पना आहे’. आता मराठीचा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा असा सवाल केला. त्यानंतर त्यांनी आम्हीही एखाद्या कार्य़क्रमात नक्कीच जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलावणार आहोत. मात्र तो कार्यक्रम हा दिवाळीचा नसणार असल्याचे वक्तव्य शेलारांनी केले आहे.

हे ही वाचा

सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील आहात; सावधान…आधी ही बातमी वाचा !

आम्हीही जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवू पण, कार्यक्रम दिवाळीचा नसेल

दिवाळी बोनस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..! आव्हाडांचे ट्विट चर्चेत

मराठी कलाकार छोटे नाहीत

दिपोत्सव हा कोणत्याही पक्षाने करावा, त्याचे स्वागत असेल. कोणत्याही कलाकाराला त्याची जात, धर्म नसते. पण जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवून अनेकांनी टीमकी वाजवली खरी, मात्र आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत.मराठीचा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा असा सवाल शेलारांनी केला. यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे शेलारांवर संतापले आहेत.

संदिप देशपांडेंचा शेलारांवर पलटवार

भाजपाचे प्रेम हे पुतण्या-मावशीचे आहे. एवढे वाटते तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा. निदान बोलण्याची हिंमत तरी दाखवलीत का? मराठी कलाकारांवर अन्याय झाल्यावर पाठिशी कोण उभे राहते, हे महाराष्ट्राला माहिती आहे. दिवाळीनिमीत्त थोडासा प्रकाश पाडावा, असा टोला लगावत संदिप देशपांडेंनी आशिष शेलारांवर पलटवार केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी