31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयपंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस काशी दौऱ्यावर, काशी विश्वनाथ कॉरीडॉरचं लोकार्पण,...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस काशी दौऱ्यावर, काशी विश्वनाथ कॉरीडॉरचं लोकार्पण, वाचा संपूर्ण दौरा

टीम लय भारी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. खरं तर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत. पण पंतप्रधान मोदींचा हा दौरा फक्त निवडणूक दौरा म्हणून पहाता येणार नाही. तो काहीसा खास आहे(Narendra Modi to visit Kashi for two days from today)

कारण तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या वाराणसीचा कायापालट गेल्या काही काळात केला गेलाय. त्यातल्या अनेक प्रोजेक्टचा लोकार्पण सोहळा आयोगीत केला गेलाय. पंतप्रधान मोदी त्याचं उदघाटन करणार आहेत.

Narendra Modi : शेतक-यांना अधिकार दिला, कृषी कायद्यात चुकीचे काय?

Narendra Modi : किसान योजना PM मोदी आज 6 राज्यातील शेतकर्‍यांशी साधणार संवाद, शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवणार 18 हजार कोटी

अनेक नव्या प्रोजेक्टची पायाभरणीही मोदी करतील. यात सर्वात चर्चेत असलेला प्रोजेक्ट आहे काशी विश्वनाथ कॉरीडॉर. त्याची फक्त उत्तर प्रदेशच नाही तर देशभर चर्चा आहे. कारण ह्या एका प्रोजेक्टमुळे वाराणसीचा कायापालट झालाय.

कसा आहे पंतप्रधानांचा काशी दौरा?

वाराणसी हा खुद्द पंतप्रधानांचाही लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे ते दोन दिवस होमग्राऊंडवर असतील. 13 आणि 14 डिसेंबर मोदी वाराणसीत असतील. दोन दिवसांचा हा दौरा 30 तासांचा असेल. आज सकाळी 10 वाजता मोदी काशीत पोहोचतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि इतर प्रतिनिधी त्यांचं एअरपोर्टवर स्वागत करतील.

Narendra Modi : शेतकरी आंदोलन सुरू असताना मोदींची गुरुद्वाराला भेट

PM Narendra Modi wishes ‘speedy recovery’ after South African President Cyril Ramaphosa tests COVID positive

पंतप्रधान मोदी हे एअरपोर्टहून संपूर्णानंद मैदानापर्यंत हेलिकॉप्टरनं जातील. त्यानंतर ते बाबा कालभैरवांच्या दर्शनासाठी रवाना होतील. त्या दर्शनसोहळ्यानंतर मोदी हे खिडकिया घाटावर जातील. त्यानंतर मात्र मोदी दुपारी दीड वाजता क्रुजमधून काशी विश्वनाथ कॉरीडॉरमध्ये प्रवेश करतील.

दुपारनंतरचा मोदींचा कार्यक्रम

काशी विश्वनाथ कॉरीडॉरमध्ये मोदी बराच वेळ घालवतील असं दिसतंय. 1 वाजून 50 मिनिटांनी ते विश्वनाथ कॉरीडॉरचं लोकार्पण करतील. त्या कार्यक्रमानंतर पीएम मोदी हे बरेका गेस्ट हाऊसला पोहोचतील. सायंकाळी ते रो रो बोटीनं गंगा आरतीत सहभागी होतील. ही वेळ असेल 5.30 ची. यावेळी मोदींसोबत इतर नेते मंडळीही आरतीत असतील. नंतर ते परत मुक्कामाला बरेका गेस्ट हाऊसवर येतील.

14 डिसेंबरचा कार्यक्रम

उद्या म्हणजेच 14 डिसेंबरला सकाळी साडे नऊ वाजता काशी वाराणसी महानगर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत मोदी बैठक करतील. ही बैठक अर्धा तास चालेल. सकाळी दहा वाजता भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु होईल. भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं हे संमेलन चार तास चालण्याची शक्यता आहे.

यात गुजरात, गोवा, हरयाणा, कर्नाटक, आसाम, अरुणाचलप्रदेश, मध्यप्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंडचे मुख्यमंत्री स्वत:च्या राज्यातल्या विकास कामांवर प्रजेंटेशन देतील. दुपारी 2.30 वाजता मोदी मुख्यमंत्र्यांची बैठक आटोपून तीन वाजता स्वर्वैद मंदिरात जातील. तिथं मोदींचा अडीच तासाचा कार्यक्रम निर्धारीत आहे. इथं ते अनुयायी, भक्तांना संबोधीत करतील. स्वर्वेद मंदिराचा हा 98 वा वार्षिकोत्सव आहे. तिथून मोदी सायंकाळी साडे चार वाजता दिल्लीसाठी रवाना होतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी