29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयस्व. शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती... : नितेश राणे

स्व. शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती… : नितेश राणे

टीम लय भारी

मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. स्व. शिवसेनाप्रमुखांची शपथ घेण्यापेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर परबांवर अजून विश्वास आला असता. असे विधान नितेश राणे यांनी केले आहे (Nitesh Rane slammed state transport minister Anil Parab).

नितेश राणेंनी ट्विट करत परब यांच्यावर ही टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेण्यापेक्षा आताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शपथ घेतली असती तर परबांवर अजून विश्वास आला असता. असे म्हणत त्यांनी परबांवर घणाघात केला आहे.

अनिल परब यांच्यावर सीबीआय चौकशी लावावी – आशिष शेलार

‘निलम गोऱ्हे, अनिल परब यांना न्यायालयात खेचणार’

अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशी साठी बोलावणे धाडले आहे. या वेळी पत्रकारांशी सवांद साधताना त्यांनी सांगितलं होते की, मी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी काहीही चुकीचं केलेलं नाही. आताही मी तेच सांगेन मी काही चुकीचं केलेलं नाही. तसेच, मला दुसरा समन्स ईडी कडून आल्याने मी चौकशीला सामोरे जात आहे. असे अनिल परब म्हणाले होते.

हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल

On way to ED office, Maha minister Anil Parab says not clear about case details

अनिल परब यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणासाठी समन्स जारी केला होता. त्यासाठी त्यांना ईडीने चौकशी साठी बोलावले आहे. परब यांना ईडीने पहिला समन्स २९ ऑगस्ट रोजी पाठवला होता. त्या नंतर त्यांना ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी