35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeराजकीयNitin Gadkari : गरीब-श्रीमंतीचे अंतर कमी झाले पाह‍िजे - नितीन गडकरी

Nitin Gadkari : गरीब-श्रीमंतीचे अंतर कमी झाले पाह‍िजे – नितीन गडकरी

देशाला आत्मनिर्भर बनवायचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. तसेच भारताला आम्हाला बायोफ्युल एक्स्पोर्ट करणारा देश बनायचे आहे असे, नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. आज भारत विकास परिषदेच्या संमेलनात नितीन गडकरी बोलत होते.

देशाला आत्मनिर्भर बनवायचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. तसेच भारताला आम्हाला बायोफ्युल एक्स्पोर्ट करणारा देश बनायचे आहे असे, नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. आज भारत विकास परिषदेच्या संमेलनात नितीन गडकरी बोलत होते. भारताच्या विकासातील असमतोल कमी झाला पाहिजे. ग्रामीण भागाचा विकास व्हायला हवा. गरीब-श्रीमंतीचे अंतर कमी व्हायला हवे. समाजातील विषमता कमी व्हायला हवी. त्याचबरोबर आर्थिक विषमता देखील कमी झाली पाहिजे. त्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील लोक शहरात कामासाठी येतात. ती त्यांची मजबूरी असते. शहरातील लोकसंख्या वाढल्याने शहरात समस्या निर्माण होतात. त्यामुळे गावांचा विकास झाला पाहिजे. रोजगार निर्मीती झाली पाहिजे. ग्रामीण भाग शक्तीसंपन्न झाला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

आपण स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. सुराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. त्यावेळी म. गांधी म्हणले होते की, आम्हाला स्वराज्य मिळाले आहे. आता सुराज्य निर्माण करायचे आहे. आपले उद्दिष्ट ठरलेले आहे. मात्र आपण त्यापासून दूर आहोत. त्याचा वेग वाढवण्याची गरज आहे. आपली जगातील 5 वी अर्थव्यवस्था आहे. मी दुर्गम भागात देखील रस्ते बनवले. या देशातून पेट्रोल, डिझेल संपवायचा माझा संकल्प आहे. त्यामुळे प्रदूषण होते. माझा इलेक्ट्रिक आणि इथेनॉलनची वाहने वापरण्यावर भर आहे. यावर चालणारी वाहने बनत आहेत.

हे सुद्धा वाचा

World Health Day : हृदय निरोगी ठेवायचे असेल तर ‘या’ गोष्टी नक्की करा

America : अमेरिकेतल्या ‘या’ भागात झाली बत्तीगुल

CDS : भारताच्या ‍संरक्षणदल प्रमुख पदी अन‍िल चौहान यांची नियुक्ती

बायो-फ्युलंमुळे खेडे गावात रोजगार तयार होईल. त्यामुळे भारत आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल. आपला देश बायोफ्युल एक्सपोर्ट करणारा देश बनला पाहिजे. देशाला विश्वगुरू बनायचे असेल तर गतीमानपणे काम करायला हवे, कमी वेळात जास्त काम करायला हवे. हवेत उडणारी बस देखील आणण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी