33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयराणेंचा भंपकपणा, 'मोदी एक्स्प्रेस'च्या नावाने गणेशभक्तांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

राणेंचा भंपकपणा, ‘मोदी एक्स्प्रेस’च्या नावाने गणेशभक्तांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

टीम लय भारी

मुंबई : गणपतीसाठी अनेक लोक कोकणात जातात. बाकी कोणत्या सणाला तरी गावी जाणे झाले नाही तरी गणेशोत्सवासाठी आवर्जून कोकणात जातात. आमदार नितेश राणे यांनी कोकणवासीय गणेशभक्तांना गावी जाण्यासाठी मोफत गणपती स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’ रेल्वे सेवा सुरू केली आहे (Rane tries to attract Ganesh devotees in the name of Modi Express).

आमदार नितेश राणे यांनी सलग ९ व्या वर्षी गणेशभक्तांसाठी अभिनव प्रवास योजना सुरू ठेवली आहे. ‘मोदी एक्स्प्रेस’ रेल्वे ही दादर ते सावंतवाडी पर्यंत आहे. मंगळवार (दि. ०७ सप्टेंबर २०२१) रोजी सकाळी १० वाजता दादर स्टेशन, प्लॅटफार्म नंबर ८ वरून सुटणार आहे. तसेच या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांना एक वेळेचे मोफत जेवण दिले जाणार आहे. राणेंनी ‘मोदी एक्स्प्रेस’च्या नावाने गणेशभक्तांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने पाडले भगदाड

तिचा बाप कोण? रोख ठोक उत्तर द्या : नितेश राणे

Rane tries Ganesh devotees in the name of Modi Express
कोकणवासीय गणेशभक्तांना गावी जाण्यासाठी मोफत गणपती स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’ रेल्वे सेवा

 

नारायण राणेंमुळे खंडीत झालेली जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून सुरू होणार

‘Narayan Rane Made a Political Rivalry Personal’: Shiv Sena’s Sanjay Raut on Slapgate

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या आता एकूण १५० फेऱ्या होणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेने आधीच जाहीर केले आहे अशा ७२ फेऱ्या आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेने जाहीर केलेली अतिरिक्त ट्रेनच्या ४० फेऱ्या आणि सध्या परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आत्ता ३८ फेऱ्या भारतीय रेल्वेच्या जाहीर केल्या आहेत. अशा एकून १५० गणपती स्पेशल रेल्वेच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. याचे नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची काळजी केंद्र सरकार घेईल (The Central Government will take care of every passenger going to Konkan).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी