30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईआपल्या पोरा-बाळांना उद्धव ठाकरेंचे शेवटचे भाषण दाखवा : संजय आवटे

आपल्या पोरा-बाळांना उद्धव ठाकरेंचे शेवटचे भाषण दाखवा : संजय आवटे

टीम लय भारी

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येऊन आपले शेवटचे भाषण केले. या भाषणानंतर त्यांच्यासाठी जनतेमध्ये सहानुभूतूची लाट निर्माण झाली.

याबाबतची एक पोस्ट ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी पोस्ट लोकांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. ‘उद्धव ठाकरेंच्या निरोपाचं आजचं भाषण तुमच्या पोरं-बाळांना दाखवा. पक्ष वगैरे विसरा’ यांनी या पोस्टच्या सुरुवातीला लिहिले आहे. ‘पण, आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. आपल्या पुढ्यातल काही हिरावून नेलं जात. आपलीच माणसं आपल्याला दगा देतात. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. आपल्याला अवमानित केलं जातं… त्याही स्थितीत चडफड न करता, घसा ताणून न किंचाळता, निराश-विफल न होता, शिवीगाळ न करता कसं शांत राहावं, आजच्या पोरांच्या भाषेत कसं ‘कुल’ राहावं, यासाठी हे भाषण बघू द्या त्यांना. आयुष्यात कधीतरी तुमच्या मुलाबाळांना हे उपयोगी पडेल. – संजय आवटे’

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देताना दाखवलेला संयम हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून येत आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासारखा संयमी वृत्ती असलेला व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून पुन्हा मिळणार नाही, असे मत जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा :

शरद पवार म्हणाले, शपथ घेताना देवेंद्र फडणविसांचा चेहरा नाखूष होता

‘लय भारी’चे भाकीत ठरले खरे, एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सात दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली होती बातमी

एकनाथ शिंदेंच्या मुख्यपंत्रीपदामुळे आनंदी चेहरे कमी, दुःखी चेहऱ्यांचीच संख्या जास्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी