30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

टीम लय भारी

मुंबई : देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांची आज भेट झाल्याने खळबळ माजली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे ( Sanjay Raut given clarification on his meeting with Devendra Fadnavis ).

आमची भेट ही गुप्त नव्हती. आम्ही जाहीरपणे भेटलो आहे. ‘सामना’साठी मुलाखत घ्यायची होती म्हणून भेटलो. ( Sanjay Raut met to Devendra Fadnavis ) मध्यंतरी मी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळीच मी म्हटलो होतो की, देवेंद्र फडणवीस, राहूल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणार आहे. त्या अनुषंगानेच फडणवीस यांना भेटलो असल्याचे राऊत म्हणाले ( Sanjay Raut was taken interview of Sharad Pawar ).

हे सुद्धा वाचा

धनगर आरक्षण कृती समितीचा ठराव : ठाकरे सरकारने केंद्राला आरक्षणाची शिफारस करावी, मोदी सरकारने ते अंमलात आणावे

SpeakUpForFarmers : बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर डागली तोफ, कायदे रद्द होईपर्यंत केंद्र सरकारविरोधात संघर्ष करणार

फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का ? ते माजी मुख्यमंत्री आहेत. आता विरोधी पक्षनेते आहेत. राजकारणात अशा भेटी होत असतात, असेही राऊत म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या भेटीबद्दल मला काहीही माहित नाही. पण राजकारणात अशा भेटी होत असतात. हे सरकार पाडणार असे आम्ही कधीही म्हणालेलो नाही. आंतर्विरोधामुळे हे सरकार पडेल असे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ग्रॅंट हयात हॉटेलमध्ये फडणवीस व राऊत यांची ही भेट झाली होती. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे भाजप व शिवसेना पुन्हा एकत्र येणार की काय ? महाविकास आघाडी सरकार पडणार तर नाही ना ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु संजय राऊत यांनी आता स्पष्टीकरण दिल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळेल असे बोलले जात आहे.

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी