32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयकामावर जाण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं हित, जे भडकवतायत ते कुटुंब जगवायला येणार नाहीत...

कामावर जाण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं हित, जे भडकवतायत ते कुटुंब जगवायला येणार नाहीत – संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई: कामगारांना भरघोस वेतनवाढ दिलेली आहे. विषय आहे विलीनीकरणासंदर्भात तो विषय न्यायालयात आहे(Sanjay Raut: It is in the interest of ST employees to go to work)

कामगारांनी आता पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं हित आहे. जे कोणी त्यांचे वकील आहेत भडकवत आहेत, ते त्यांचं कुटुंब जगवायला येणार नाहीत, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

Shivsena : देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ केली. मात्र एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना कामावर जाण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचं हित आहे, असं म्हटलं.

कामगारांनी आता पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं हित आहे. जे कोणी त्यांचे वकील आहेत भडकवत आहेत, ते त्यांचं कुटुंब जगवायला येणार नाहीत.आम्ही गिरणी कामगारांची अवस्था मुंबईत पाहिली आहे, आम्हा मराठी माणसांची.

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं रामदास कदम यांच्यावर अन्याय? संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut hopeful of MSRTC workers’ strike ending soon

एसटी कर्मचारीसुद्धा मराठी बांधव आहेत. तेव्हा त्यांनी अत्यंत शहाणपणाने आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि निर्णय घ्यावा, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ

आज संविधान दिन आहे. केंद्र सरकारने दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला आहे. यावर तृणमूल आणि काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसविषयी सांगू शकत नाही. पण माझ्यामते काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे.

संपूर्ण विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. कारण या देशामध्ये संविधान पायदळी तुडवलं जातं. संविधानाचं राज्य या देशात राहिलेलं नाही. हुकूमशाहीपद्धतीने काम चाललं आहे. राज्य घटना, त्यातील अनेक कलमं, विशेषत: राज्यांचे अधिकार मोडले जात आहेत. त्यामुळे संविधान दिन साजरा करण्याचं नाटक कशाला? असा सवाल राऊत यांनी भाजपला केला.

हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये काही मुद्दे मांडले होते. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे. पण तो धर्मग्रंथ गेल्या काही वर्षांपासून रोज पायाखाली तुडवला जातो.

त्याची अवहेलना केली जाते असं सांगत सरकारने जो संविधान दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे केंद्राने त्यावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी